धक्कादायक...! वंदे भारत ट्रेनचा अपघात घडवण्याचा कट, रेल्वे रुळावर...; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:09 PM2023-10-02T18:09:01+5:302023-10-02T18:12:42+5:30
सांगण्यात येते की, ट्रेन रुळावरून घसरून अपघात व्हावा, या हेतूने रुळावर दगड आणि लोखंडाचे तुकडे ठेवण्यात आले होते.
संपूर्ण देशभरात वंदे भारत ट्रेनची जबरदस्त चर्चा सूरू आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनकडे भारतीय रेल्वेची शान म्हणून पाहिले जात आहे. असे असतानाच, राजस्थानातील भीलवाडा येथे वंदे भारत ट्रेनला अपघात घडवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हारल होत आहे.
सांगण्यात येते की, ट्रेन रुळावरून घसरून अपघात व्हावा, या हेतूने रुळावर दगड आणि लोखंडाचे तुकडे ठेवण्यात आले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये रुळावर मोठ्या प्रमाणावर दगड आणि लोकंडाचे तुकडे ठेवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एका ठिकाणी तर, रुळामध्ये दोन लोखंडी तुकडे फसवून त्यात दगड ठेवल्याचे दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सांगण्यात येते की, उदयपूर-जयपूर वंदे भारत ट्रेन संबंधित ठिकाणावरून जाण्यापूर्वी रेल्वे रुळावर दगड आणि लोखंडाचे तुकडे ठेवले होते. मात्र, लोको पायलटच्या हे वेळेतच लक्षात आल्याने त्याने रेल्वे थांबवली. यानंतर रेल्वे रुळ व्यवस्थित केल्यानंतर ट्रेन पुढे गेले.
गेल्या 24 सप्टेंबरलाच जयपूर-उदयपूर वंदे भारत ट्रेनला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ही राजस्थानातील तिसरी वंदे भारत ट्रेन आहे.
Miscreants attempts to sabotage the Udaipur - Jaipur Vande Bharat Express at Bhilwara
— Deepak Kumar Jha (@journalistjha) October 2, 2023
Alert pilot and staff averted mishap of the semi high speed train that has been a craze in the country
@RailMinIndia pic.twitter.com/pta9bX4ani
संबंधित घटनेसंदर्भात भारतीय रेल्वेकडून अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, उत्तर-पश्चिम रेल्वे आरपीएफकडून याप्रकरणी कारवाई संदर्भात भाष्य करण्यात आले आहे. काही लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना रेल्वेकडे तक्रार केली आहे. यावर, भीलवाडाचे निरीक्षक या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करत आहे, असे उत्तर अजमेर आरपीएफकडून देण्यात आले आहे.