दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 03:07 PM2022-04-07T15:07:53+5:302022-04-07T15:08:30+5:30

Covid-19 : सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 488 आहे. दुसरीकडे, संसर्ग दर एक टक्क्यांच्या वर म्हणजेच 1.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

shocking covid-19 situation in delhi coronavirus positive rate goes high xe variant is too challenging | दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

Next

दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 126 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाण 4 एप्रिलपासून सातत्याने वाढत आहे.

कोरोनाच्या घटत्या प्रकरणामुळे डीडीएमएच्या बैठकीत मास्क न लावल्यास लागू करण्यात आलेला दंडही रद्द करण्यात आला होता. दरम्यान, संसर्ग दर 1.12 टक्के नोंदवला गेला आहे. मंगळवारी दिल्लीत 112 नवीन रुग्ण आढळले, तर यादरम्यान 92 रुग्ण बरेही झाले.

सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 488 आहे. दुसरीकडे, संसर्ग दर एक टक्क्यांच्या वर म्हणजेच 1.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. होळीपूर्वी दिल्लीत संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांच्या वर होते आणि होळीनंतर ते 0.87 टक्क्यांच्या जवळ आले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढल्याने लोकांची चिंता वाढू शकते. 

सोमवारी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाची 82 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दरम्यान 95 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राजधानीत संसर्गाचा दर 1.34 टक्के नोंदवला गेला. यापूर्वी, रविवारी दिल्लीत कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळले होते आणि संसर्ग दर 0.86 टक्के होता.

नवीन व्हेरियंट XE ची चर्चा
दरम्यान, कोरोनाच्या नवीन व्हेरियंट XE ची चर्चा देशात जोर धरत आहे. नवीन प्रकार ओमायक्रॉनपेक्षा 10 पट प्राणघातक आहे. दरम्यान, मुंबईत ज्या महिलेला XE प्रकाराची लागण झाल्याचा दावा करण्यात आला होता, तो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला आहे.

Web Title: shocking covid-19 situation in delhi coronavirus positive rate goes high xe variant is too challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.