धक्कादायक! परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या ड्रायव्हरला अटक; पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:11 PM2022-11-18T19:11:44+5:302022-11-18T19:11:51+5:30

आरोपी ड्रायव्हरला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIने हनी ट्रॅप केले.

Shocking! Driver working in Ministry of Foreign Affairs arrested; Provided secret information to Pakistan | धक्कादायक! परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या ड्रायव्हरला अटक; पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली

धक्कादायक! परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या ड्रायव्हरला अटक; पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली

googlenewsNext

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या चालकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हा ड्रायव्हर गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते. या चालकाच्या अटकेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. परराष्ट्र मंत्रालयात काम करणारे आणखी लोक या प्रकरणात गुंतले आहेत का, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान अनेकदा उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवतो. पण, यावेळी त्यांनी ड्रायव्हरचा वापर केला आहे.

Web Title: Shocking! Driver working in Ministry of Foreign Affairs arrested; Provided secret information to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.