धक्कादायक ! पतीच्या अंत्यसंस्कारासाठी तिनं मुलाला ठेवलं गहाण
By admin | Published: May 16, 2017 09:07 AM2017-05-16T09:07:13+5:302017-05-16T09:14:56+5:30
पतीच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आपल्या मुलालाच गहाण ठेवावं लागल्याची घटना कधी तुम्ही ऐकली. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 16 - शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा एखाद्या लग्नकार्यासाठी आपण आपली बहुमूल्य वस्तू गहाण ठेऊन त्या-त्या वेळच्या आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण पतीच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आपल्या मुलालाच गहाण ठेवावं लागल्याची घटना कधी तुम्ही ऐकली. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील ताज नगरी येथे नागालँडमधील एक महिला आपल्या मुलासहीत रस्त्यावर उद्धवस्त अवस्थेत फिरताना दिसली. ही महिला नागालँडमधील दीमापूर येथील रहिवासी होती व ती आग्रा येथे आर्थिक उत्पन्नासाठी आली होती. कारण त्या उत्पन्नाद्वारे आपल्या गहाण ठेवलेल्या एका मुलाची सुटका होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र परिस्थितीला ते मान्य नव्हते.
काय आहे नेमकी घटना?
महिलाच्या पतीचे 7 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यावेळी महिलेकडे पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पैसे नव्हते. पतीचे अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी तिनं महाजन नामक व्यक्तीकडून 2000 रुपये उधार स्वरुपात घेतले. या उधारीच्या बदल्यात तिला दोन मुलांपैकी 7 वर्षांच्या एका मुलाला महाजनकडे गहाण म्हणून ठेवण्याचा मनाविरुद्ध सौदा करावा लागला. महाजनकडून मुलाची सुटका करावी यासाठी मदतीच्या अपेक्षेनं तिनं नातेवाईकांकडे धाव घेतली. यावेळी महिलेला ताजनगरीमध्ये नोकरी तर मिळाली नाही, मात्र तिला स्वतःसहीत दुस-या मुलासाठी दोन वेळेचे अन्न मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, महाजननं सिक्युरिटी डिपॉझिट स्वरुपात मुलाला त्याच्याकडे ठेवले होते. मुलाची सुटका करण्यासाठी तिनं नागालँड येथे चहाच्या मळ्यात काम करणं सुरू केले, जेथे तिला 40 रुपये प्रतिदिवस असे उत्पन्न मिळत होते. मात्र याद्वारे मुलांची सुटका करणं सोपी बाब नाही, हे तिला ठाऊक होतं.
मुलाच्या सुटकेसाठी महिलेचा संघर्ष
त्यानंतर महिलेनं ही समस्या आपल्या नातेवाईकासमोर मांडली. नातेवाईकाने महिलेला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. पण तिची परिस्थिती पाहून या नातेवाईकानं पळ काढला. त्यातच आग्रामध्ये पोहोचलेल्या या महिलेजवळ ना खाण्यासाठी पैसे होते ना राहण्यासाठी सोय होती. आपल्या मुलांसहीत तिला रस्त्यावर राहण्याची वेळ ओढावली होती. अशाच वेळी एकदा नाल्यातील पाणी मुलाला पाजत असताना परिसरातील एका दुकानदारानं पाहिले. हे पाहून त्या दुकानदाराला धक्काच बसला. त्या महिलेची दया आल्यानं त्यानं महिला व तिच्या मुलासाठी पाण्याची बाटली विकत घेतली. महाजननं मुलाची भेट घेण्यावर बंदी आणल्यानं नैराश्यग्रस्त झालेल्या या महिलेनं मुलाचे नाव स्वतःच्या हातावर लिहिल्याचे त्यानं पाहिले.
याचदरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्यानं संबंधित महिलेची परिस्थिती पाहून तिच्यासोबत संवाद साधला व याबाबतची माहिती एका सामाजिक संस्था आणि पोलिसांना दिली. महिलेची हलाखीची परिस्थिती पाहून परिसरातील दुकानदारांनी तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. या दुकानदारांनी तिला 3500 रुपयांची मदत केली, जेणेकरुन ती आपल्या मुलाची महाजनच्या तावडीतून सुटका करुन स्वतःच्या घरी सुखरूप जाऊ शकेल.