Video: गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा, ३०० व्हिडिओ, फोटो लीक; युवतींचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:59 PM2024-08-30T12:59:54+5:302024-08-30T14:38:14+5:30
Hidden camera in washroom of girls hostel: मागच्या काही दिवसांपासून देशभरातून महिला अत्याचारांबाबतच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. दरम्यान, आता आंध्र प्रदेशमधून असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून देशभरातून महिला अत्याचारांबाबतच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. दरम्यान, आता आंध्र प्रदेशमधून असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणीची नजर या कॅमेऱ्यावर पडली. त्यानंतर तिने याबाबतची माहिती हॉस्टेल व्यवस्थापनाला दिली होती. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले काही व्हिडीओ मुलांच्या हॉस्टेलमध्येही शेअर झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नाराज असलेल्या विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं आहे.
याबाबत मिळाललेल्या माहितीनुसार ही घटना आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात घडली आहे. येथील गुडलवालेरू कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा लावण्यात आलेला होता. याबाबतची माहिती मिळताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या परिसरात घोषणाबाजी सुरू केली. हे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Krishna, Andhra Pradesh | Students protest over hidden cameras being allegedly installed in the girls' hostel washrooms of an engineering college.
— ANI (@ANI) August 30, 2024
Gudlavalleru Sub-Inspector Satyanarayana says, "No hidden cameras have been found on the premises so far, but the investigation is…
दरम्यान, आंदोलनाला तोंड फुटताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला तातडीने सुरुवात केली. तसेच इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
A hidden camera has been reportedly found inside the washroom of a girls' hostel in Andhra Pradesh's Krishna district.
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) August 30, 2024
The hostel was for the students of SR Gudlavalleru Engineering College, where massive protests have now erupted.
The police have identified the accused as… pic.twitter.com/Pebp1ZEl6d
दरम्यान, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीचं आश्वासन दिलं आहे. तसेच कॉलेज प्रशासन या प्रकरणी तपासासाठी अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल, असं आश्वासनही कॉलेज प्रशासनानं दिलं आहे.