संतापजनक! तुटलेला पायच डोक्याखाली उशीसारखा वापरला, डॉक्टरांच्या असंवेदनशिलतेने सारेच हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 09:07 AM2018-03-11T09:07:56+5:302018-03-11T09:07:56+5:30
शनीवारी एका शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणा-या घनश्माय या व्यक्तीचा अपघातात पाय तुटला.
झांसी : उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. झांसी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी उपचारासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्याखाली त्याच्याच तुटलेल्या पायाचा उशीसारखा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टारांच्या या असंवेदनशिलतेने रूग्णालायात उपस्थित सारेच हादरले. प्रकार पाहून संतापलेल्या लोकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश प्रशासनाने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सला निलंबीत केलं आहे.
शाळेची बस उलटल्याने पाय तुटला -
झांसी जिल्ह्यातील मऊरानीपुर येथे शनीवारी एका शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणा-या घनश्माय या व्यक्तीचा अपघातात पाय तुटला. जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. घनश्याम याला रूग्णालयात दाखल केलं असता तेथे उपस्थित डॉक्टरांनी चक्क त्याच्याच तुटलेल्या पायाचा उशीसारखा वापर केला.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल -
रूग्णालायातील उपस्थित लोकांनी हा प्रकार पाहून फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो व्हायरल झाल्याने प्रकरण प्रशासनापर्यंत पोहोचलं.
#UttarPradesh: Attendants of a patient allege that staff at Maharani Laxmi Bai Medical College, Jhansi used his severed leg as a pillow for him after he was admitted there upon meeting with an accident, College Principal says 'We've set up committee to probe & will take action'. pic.twitter.com/lJFJ3SCjWf
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2018