'भारत बंद'दरम्यान धक्कादायक घटना, पोलिस अधिकाऱ्याच्या पायावर चढवली कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:18 PM2021-09-27T15:18:29+5:302021-09-27T15:43:11+5:30

भारत बंदमध्ये बंदोबस्तावर असलेले बंगळुरुचे DCP धर्मेंद्र मीना यांच्यावर कार चढवण्यात आली.

Shocking incident during 'Bharat Bandh', a car crashed to DCP dharmendra meena in banglore | 'भारत बंद'दरम्यान धक्कादायक घटना, पोलिस अधिकाऱ्याच्या पायावर चढवली कार

'भारत बंद'दरम्यान धक्कादायक घटना, पोलिस अधिकाऱ्याच्या पायावर चढवली कार

Next

बंगळुरू: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांकडून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या भारत बंदला पाठिंबा मिळत आहे. यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पण, यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बंगळुरूमध्ये डीसीपी धर्मेंद्र मीना यांच्या पायावर कार चढवल्याची घटना घडलीये.

हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही, भाजप नेते किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

बंगळुरू नॉर्थचे डीसीपी धर्मेंद्र मीना सोमवारी ड्युटीवर होते. या बंदोबस्तादरम्यान त्यांच्या पायावर एका आंदोलकांनी कार चढवली. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले इतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. हरीश गौडा असं चालकाच नाव असून, तो प्रो कन्नड संघटनेचा सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. या संघटनेनं शेतकरी बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय जाता येणार 'सिंगापूर'ला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण ?

बंगळुरुत भारत बंदला थंड प्रतिसाद
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'चा बंगळुरुमध्ये फारसा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही. शहरात बऱ्याच ठिकाणी बाजारपेठा सुरू आहेत. वाहतूकही नेहमीप्रमाणे सुरू आहे, पण काही ठिकाणी महामार्ग बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आलाय.

विरोधात शेतकऱ्यांची संख्या खूप कमी

कृषी कायद्याच्या विरोधात शहरातील टाऊन हॉलमध्ये विविध राजकीय संघटना जमल्या होत्या, परंतु त्यांची संख्या केवळ 200 च्या आसपास होती. यावेळी आंदोलनाच्या नेत्यांना याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी माध्यमांवर त्यांचे कार्यक्रम योग्यरित्या दाखवत नसल्याचे सांगून अपयशाचा दोष मीडियावर टाकला. 
 

Web Title: Shocking incident during 'Bharat Bandh', a car crashed to DCP dharmendra meena in banglore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.