धक्कादायक! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 10:47 IST2018-08-20T10:47:48+5:302018-08-20T10:47:58+5:30
झारखंडमधल्या लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले आहेत.

धक्कादायक! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार
रांची- झारखंडमधल्या लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व 11 आरोपींना अटक केली आहे. डीएसपी आशिषकुमार महली म्हणाले, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींचं वय 18 ते 28 वर्षांपर्यंत आहे. या सर्व आरोपींनी 16 ऑगस्टला दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.
बलात्कार पीडित मुली आणि एक मुलगा एकाच मोटारसायकलवरून जात असताना हिरही रेल्वेपुलाजवळ त्यांच्या मोटारसायकलमध्ये काही तरी बिघाड झाला. त्यामुळे पीडितेतील एकीनं तिच्या मित्राला फोन करून मदत मागितली. परंतु तिच्या मित्रानं स्वतः न येता 11 जणांना त्या ठिकाणी पाठवलं. त्या 11 जणांनी मुलींबरोबर असलेल्या मुलाला मारहाण करून पळवून लावलं आणि दोन्ही मुलींना एका अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला.
आरोपींनी दोन्ही पीडित मुलींचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षक प्रियदर्शी आलोक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.