धक्कादायक... केरळमधील पत्रकार इसिसमध्ये भरती

By admin | Published: August 5, 2015 11:56 AM2015-08-05T11:56:07+5:302015-08-05T11:56:07+5:30

भारतातील १३ तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया अर्थात इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर येत असतानाच या तरुणांमध्ये केरळमधील एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे समजते.

Shocking ... journalist in Kerala recruited in Isis | धक्कादायक... केरळमधील पत्रकार इसिसमध्ये भरती

धक्कादायक... केरळमधील पत्रकार इसिसमध्ये भरती

Next

ऑनलाइन लोकमत 

कोच्ची, दि. ५ - भारतातील १३ तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया अर्थात इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर येत असतानाच या तरुणांमध्ये केरळमधील एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे समजते. गुप्तचर यंत्रणांनी या तरुणाविषयी केरळ सरकारला माहिती दिली आहे. 
केरळमधील पुदूप्परियम येथे राहणारा अबू ताहीर (व. २४ वर्ष) हा एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी अबू ताहीर कतारमध्ये वडिलांकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र कतारला जाण्याऐवजी अबू थेट सिरीयात दाखल झाला व सध्या तो इसिसमध्ये काम करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. 
गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणांची केरळच्या गृहखात्यातील वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक झाली. या बैठकीत अबू ताहीर इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती केरळ सरकारला देण्यात आली. सोशल मिडीयाद्वारे अबू इसिसकडे आकर्षित झाला असेल व या माध्यमातूनच त्याने इसिसशी संपर्क साधला असावा अशी शक्यता केरळमधील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी वर्तवली आहे. 
अबू ताहीर हा सोशिऑलॉजीतील पदवीधर असून तो चांगला तरुण होता, तो इसिसमध्ये भरती झाला हे ऐकून आम्हाला धक्काच बसला अशी प्रतिक्रिया अबूच्या शेजारी राहणा-यांनी दिली. तर अबू गेल्या २ वर्षांपासून कुठे आहे याची आम्हाला काहीच माहिती नाही असे अबूच्या आईने सांगितले. दरम्यान, अबू ज्या वृत्तपत्रात काम करत होता त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी अबू कंपनीत कंत्राट तत्त्वावर पत्रकार म्हणून काम करत असल्याचे मान्य केले. मात्र तो नुकताच वृत्तपत्रात रुजू झाला होता व पसार होण्यापूर्वी त्याचे एकाही बातमीत नाव नव्हते असे संबंधीत संपादकांनी सांगितले. अबूचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: Shocking ... journalist in Kerala recruited in Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.