बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:35 PM2021-08-19T16:35:13+5:302021-08-19T16:45:01+5:30

जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

Shocking! Kolkata man loses wife contact stuck in Kabul Afghanistan | बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

बहिणीच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती 'या' भारतीय व्यक्तीची पत्नी, आता होत नाहीये संपर्क

Next

अफगाणिस्तानवरतालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक भीतीदायक आणि अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. कोलकाता येथे राहणारे सुब्रत दत्ता हेही सध्या चिंतेत आङेत. कारण त्यांची पत्नी तिच्या बहिणीला भेटण्यासाठी काबुलला गेली होती. जेव्हापासून तालिबानने काबुलवर ताबा मिळवला तेव्हापासून त्यांचं तिच्याशी बोलणं झालं नाही. अखेरचं त्यांचं बोलणं सोमवारी झालं होतं.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांची पत्नी जून महिन्यात आपल्या परिवाराच्या भेटीला अफगाणिस्तानमध्ये गेली होती. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. सुब्रत दत्ता आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या पतीला लग्नाची कागदपत्रे लपवून ठेवण्यास सांगितलं आहे. जेणेकरून जर तालिबानचे कमांडर चौकशीसाठी आले तर त्यांना कळू नये की, तिने कुणाशी लग्न केलं आहे. कोणत्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे.

कशी झाली होती दोघांची भेट

कोलकाताच्या नागरबाजारमध्ये राहणारे सुब्रत दत्ता अहमदाबादमध्ये काम करतात. २०१५ मध्ये त्यांनी काबुलमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी लग्न केलं. तिचा जन्म अफगाणिस्तानमध्येच झाला होता. ती लग्न झाल्यावर कोलकातामध्येच राहू लागली होती. सुब्रत यांनी सांगितलं की, 'अफगाणिस्तानला कामानिमित्त गेलो होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. नंतर आम्ही ई-मेल आणि चॅटवरून बोलणं होत होतं. नंतर ती कोलकाता येथे आली आणि आम्ही लग्न केलं'.

लग्नानंतर पहिल्यांदाच काबुलला गेली

लग्नानंतर त्यांची पत्नी पहिल्यांदाच आपल्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. तेव्हापासून ती परत आली नाही. सुब्रत रोज आपल्या पत्नीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. पण ती सोमवारपासूनच ऑफलाइन आहे. ते म्हणाले की, 'तिचे आई-वडील तर आता या जगात नाहीत. पण तिचे भाऊ आणि बहीण आहेत. जेव्हा तिच्यासोबत अखेरचं बोलणं झालं होतं तेव्हा तिने ती ठीक असल्याचं सांगितलं होतं'.

सुब्रत पत्नीच्या आठवणीत म्हणाले की, 'मला माहीत आहे की, ती लवकरच माझ्यासोबत बोलेल. माझ्या पत्नी समुद्र खूप आवडतो. तिने आय़ुष्यात पहिल्यांदा माझ्यासोबत मदार्मानी बीच पाहिला होता. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिला पुन्हा तिथे घेऊन जाणार. मला माहीत आहे ती नक्की येणार'.
 

Web Title: Shocking! Kolkata man loses wife contact stuck in Kabul Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.