बापरे...! आंब्याच्या राणीला मिळतोय 1200 रुपयांचा दर; वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:04 PM2019-06-23T20:04:53+5:302019-06-23T20:05:10+5:30

काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी झाडे मध्य प्रदेशमध्ये आहेत.

shocking! Mango Queens only one fruit sold out rs 1200 rupee | बापरे...! आंब्याच्या राणीला मिळतोय 1200 रुपयांचा दर; वाचा कारण

बापरे...! आंब्याच्या राणीला मिळतोय 1200 रुपयांचा दर; वाचा कारण

Next

इंदूर : आंब्यांची राणी म्हटल्या जाणाऱ्या 'नूरजहां' प्रजातीच्या एका आंब्याचे वजन जवळपास 2.75 किलो झाले आहे. एवढ्या भल्यामोठ्या आंब्यासाठी लोक एका फळाला 1200 रुपये मोजत आहेत. मुळचा अफगाणिस्तानचा असलेल्या या आंब्याची प्रजातीचे नावच नूरजहां आहे. या प्रजातीची काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी झाडे मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कठ्ठीवाडामध्ये आहेत. 


मध्य प्रदेशमधील हा भाग गुजरातच्या सीमेवर आहे. इंदूरहून जवळपास 250 किमी लांबीवर कट्ठीवाड़ा हे गाव आहे. या आंब्याची शेती करणारे तज्ज्ञ इशाक मंसूरी यांनी सांगितले की, यावेळी हवामान चांगले राहिल्याने  'नूरजहां' च्या झाडांना चांगली फळे लगडली. यामुळे या आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो राहिले आहे. तर गेल्या तीन वर्षांत हेच वजन 2.5 किलो एवढे होते. 


वजन जास्त असल्यास या आंब्याला 1200 रुपयांचा दर आला आहे. गेल्या वर्षी नूरजहा आंब्याचे उत्पादन संकटांमुळे नष्ट झाले होते. यामुळे हा आंबा आवडणाऱ्या खवय्यांना मुकावे लागले होते. मात्र, यंदा उत्पन्न चांगले आल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच चवही चांगली लागत आहे. यामुळे छोटा आंबा 700 ते 800 रुपयांचा भाव मिळवून देत आहे. 


नूरजहा या प्रजातीच्या आंब्यांची संख्या कमी असल्याने गुजरातच्या अहमदाबाद, वापी, नवसारी आणि बडोद्यापासून आंबा प्रेमींनी आगाऊ आरक्षण नोंदविले होते. यंदा उत्पन्न चांगले आल्याने गावातील लोकही आनंदीत आहेत. 


फळ एक फुटांएवढे लांब
नूरजहा या आंब्याचे एक फळ एक एक फूट लांब असते. जानेवारीमध्ये मोहोर येतो आणि फळ जूनमध्ये पिकते. आंब्याची बीचे वजनच 150 ते 200 ग्रॅम असते. अनेक वर्षांपूर्वी या आंब्याचे वजन 3.5 ते 3.75 किलो एवढे असायचे. 
 

Web Title: shocking! Mango Queens only one fruit sold out rs 1200 rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा