धक्कादायक ! नग्न करुन केली मासिक पाळीची तपासणी
By admin | Published: March 31, 2017 12:43 PM2017-03-31T12:43:33+5:302017-03-31T12:43:33+5:30
वसतीगृहातील 70 मुलींना नग्न करुन त्यांची तपासणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 31 - मुझफ्फरनगर परिसरातील मुलींच्या वसतीगृहात वॉर्डनचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य समोर आलं आहे. वसतीगृहातील 70 मुलींना नग्न करुन त्यांची तपासणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉर्डनने मासिक पाळीदरम्यान येणा-या रक्ताची तपासणी करण्यासाठी मुलींसोबत हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळतात वॉर्डनवर तात्काळ कारवाई करत निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय वॉर्डनची चौकशीदेखील केली जाणार आहे.
मुझफ्फरनगरमधील या घटनेवर राज्य सरकारमधील मंत्री श्रीकांत शर्मा यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. "हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणी मी संबंधित अधिका-यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल", असं श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं आहे. मासिक पाळीमधील रक्त तपासण्यासाठीच वॉर्डनने हे कृत्य केल्याचा आरोप मुलींनी केला आहे.
Around 70 girls in Muzaffarnagar stripped naked by a warden to “check for menstrual blood”,warden suspended with immediate effect (March 30) pic.twitter.com/kq4TwpRbed
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2017
Muzaffarnagar: Students allege that they were stripped naked by warden to check for menstrual blood, also demand strict action against her pic.twitter.com/93SJJI7hmg
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2017
या घटनेनंतर वसतीगृहात राहत असलेल्या मुलींनी संताप व्यक्त केला आहे. वॉर्डनविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले असून लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे वॉर्डनने दावा केला आहे की, "बाथरुममध्ये रक्त दिसल्याने मला मुलींची काळजी वाटत होती, म्हणूनच मी त्यांची तपासणी केली. सर्व ठीक आहे की नाही हे पाहण्याचा मी प्रयत्न करत होते. मुलींच्या अभ्यासाच्या बाबतीत मी नेहमी कठोर भूमिकेत असते. काही लोकांनी मिळून त्यांना माझ्याविरोधात भडकावलं आहे".