धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:14 PM2022-01-07T16:14:52+5:302022-01-07T16:31:46+5:30

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती.

Shocking! Modi's boat stopped, Pakistani boat seized from Sutlej river in punjab | धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलुज नदीतून पाकिस्तानी नाव हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विमानतळावर माघारी परतत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ताफा अडवला आणि मोठा गहजब उडाला. आंदोलक शेतकऱ्यांच्या व्यत्ययामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास २० मिनिटं एका उड्डाणपुलावरच थांबून होता. विशेष म्हणजे या ठिकाणापासून पाकिस्तानची बॉर्डर केवळ 10 किमीवर होती, असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंग यांनी म्हटलं होता. आता, याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील बीएसएफ जवानांनी सतलज नदीतून पाकिस्तानी नाव (होडी) हस्तगत केली आहे. ही नाव बीओटी डीटी मलजवळ मिळाली होती. या नावेत कोण बसलं होतं, कोण प्रवास करत होतं, याचा तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जेथून ही पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तेथूनच सतलुज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. अनेकदा येथूनच तस्करी करणाऱ्यांना अमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. तर, या प्रदेशात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येते. फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील प्रदेश आहे. 

10 किमी अंतरावर पाकिस्तानी बॉर्डर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या सुरक्षेच्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंजाबचा कायदा व सुव्यवस्था फोल झाल्याचेही अरमिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या सीमारेषेपासून केवळ 10 किमी अंतरावरील मार्गावर आपण पंतप्रधानांसाठी सुरक्षित मार्ग देऊ शकत नाहीत. मग, आपणास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अरमिंदरसिंग यांनी म्हटलंय. 

काँग्रेस नेत्यांना केलं जातंय लक्ष्य

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत राज्य सरकारने केलेल्या निष्काळजपणामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेतेही या सुरक्षा यंत्रणांवरुन काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. राजधानी दिल्लीत आज राजघाट येथे भाजपा खासदारांनी मौन धरणे आंदोलन केले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भातील चुकीमुळे पंजाब सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 
 

Web Title: Shocking! Modi's boat stopped, Pakistani boat seized from Sutlej river in punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.