धक्कादायक! रहस्यमयरित्या 100 पेक्षा अधिक माकडांचा मृत्यू, चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 11:52 AM2018-03-31T11:52:37+5:302018-03-31T11:52:37+5:30
या माकडांच्या मृत्युचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांचे मृतदेह बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आलेत.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये एक फारच धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एकाच आठवड्यात 100 पेक्षा अधिक माकडं रहस्यमयरित्या मरण पावले. या माकडांच्या मृत्युचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांचे मृतदेह बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आलेत.
मीडिया रिपोर्टनुसार, या माकडांचा मृत्यू विष दिल्याने किंवा चाउमिन चटणी खाल्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. गावातील एका व्यक्तीने अशीही माहिती दिली की, एका माकडाने एका लहान मुलावर विट फेकली होती. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला होता.
दुसरीकडे गावक-यांनी आंदोलन करुन माकडांच्या मृत्युची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अनेक लोकांनी माकडांचा मृत्यू एखाद्या रोगामुळेही झाला असल्याचा संशय व्यक्त केलाय.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, गावाचे प्रमुख राजीव गोयल यांनी आरोप केलाय की, गावात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी कुणीतरी माकडांना विष दिल्याची भीती गावक-यांमध्ये आहे. कारण समाजातील लोक माकडांना हनुमानाचं रुप मानतात.