Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 07:45 PM2021-05-01T19:45:30+5:302021-05-01T19:45:52+5:30

या काळात, जशी मानुसकीची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. तशीच मानुसकीला काळीमा फासणारी उदाहरणेही पाहायला मिळत आहेत.

shocking news ambulance charges rs 10000 for 4 km news from delhi ips shared receipt | Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे सर्वांनाच माहित आहे. आज अनेक मोठ्या शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मेडिकल सप्लाय मिळेनासे झाले आहे. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोक रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांमध्येच, आपला क्रमांक केव्हा येणार, याची वाट पाहताना दिसत आहेत. याच काळात, जशी मानुसकीची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. तशीच मानुसकीला काळीमा फासणारी उदाहरणेही पाहायला मिळत आहेत. यातच, एका रुग्णवाहिका ऑपरेटरने जे केले त्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत.  (shocking news ambulance charges rs 10000 for 4 km news from delhi ips shared receipt)

CoronaVirus: भारतावर कोरोना संकट, परदेशी माध्यमांत पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका!

4 किलोमीटरसाठी 10,000 रुपये -
आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी रुग्णवाहिकेच्या बिलाचा एक फोटो शेअर केला आहे. यात लिहिले आहे, की दिल्लीत 4 किलो मीटरसाठी रुग्णवाहिकेचे भाडे 10,000 रुपये. आज जग केवळ जगातील हाहाकारच नव्हे, तर आपले नैतिक मुल्यही पाहत आहे. या घटनेत हुग्णवाहिका ऑपरेटरने एका रुग्णाला 10,000 रुपये बील आकारले आहे. जी पावती शेअर करण्यात आली आहे, ती कुण्या DK Ambulance Service ची आहे.

लोकांनी सांगितले दुःख -
एका युझरने या ट्विटवर कमेंट करताना म्हटले आहे, की त्याच्या जवळपासही अशाच पद्धतीने लुटालूट सुरू आहे. एवढेच नाही, तर यांच्या शेजारच्या मृत व्यक्तीला 5 किलो मीटर अंतरावर घेऊन जाण्यासाठी 22 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, असेही या युझरने म्हटले आहे. यावरून सहजपणे समजू शकते, की कशापद्धतीने कोरोनाचा सामना करत असलेल्या लोकांच्या मजबुरीचा फायदा घेतला जात आहे.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

...तरच आपण या घातक आजारावर मात करू शकतो -
कोरोनाचा सामना करत असलेल्या लोकांच्या मजबुरीचा कुणी फायदा घेत असेल, तर अशा लोकांनी हेही लक्षात ठेवायला हवे, की संपूर्ण जग, त्यांचा हा प्रकार पाहत आहे. या कठीण काळात लोकांनी लोकांच्या कामी येणे आवश्यक आहे. आपण एकमेकांची गरज ओळखून, त्यांना सहकार्य करूनच या गंभीर आणि घातक आजारावर मात करू शकतो.

Web Title: shocking news ambulance charges rs 10000 for 4 km news from delhi ips shared receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.