धक्कादायक ! सर्वाधिक अपघाती मृत्यूमध्ये पुणे 'या' क्रमांकावर;राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल जाहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:03 PM2020-09-03T16:03:01+5:302020-09-03T18:38:40+5:30

२०१९ मध्ये मुंबई , दिल्ली, बंगलुरु शहरांनंतर पुण्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू नोंदवले गेले..

Shocking! Pune ranks fourth in the country in accidental deaths | धक्कादायक ! सर्वाधिक अपघाती मृत्यूमध्ये पुणे 'या' क्रमांकावर;राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल जाहिर

धक्कादायक ! सर्वाधिक अपघाती मृत्यूमध्ये पुणे 'या' क्रमांकावर;राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल जाहिर

googlenewsNext
ठळक मुद्देरोड अपघातात १८.२ टक्के घट : २०१९ चा एनसीआरबीचे अहवाल

पुणे : देशातील ५३ मोठ्या शहरातील अपघाती मृत्युमध्ये पुणे शहर चौथ्या क्रमांकावर असून मुंबई, दिल्ली, बंगलुरु शहरांनंतर पुण्यात सर्वाधिक अपघाती मृत्यु २०१९ मध्ये नोंदविले गेले. त्याचवेळी रस्ता अपघातात १८.२ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. 

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१९ मधील अपघात व आत्महत्या संबंधीचा अहवाल बुधवारी जारी केला आहे. देशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ५३ शहरांमध्ये गेल्या वर्षी ६१ हजार ४०४ अपघाती मृत्यु झाले. यामध्ये रोडवरील अपघात, आग, वीजेचा धक्का बसून, पाण्यात पडून, विष पिऊन, उंचावरुन पडून अशा विविध अपघातात मिळून मृत्यु झालेल्यांचा समावेश आहे. मुंबईत सर्वाधिक ९ हजार २४६ जणांचा मृत्यु झाला आहे. त्या पाठोपाठ दिल्ली ४ हजार ५१६, बेंगलुरु ४ हजार १६, पुणे ३ हजार ९४९, जयपूर २ हजार ६२८, सुरत २ हजार ३५३ जणांचा मृत्यु झाला आहे.

पुण्यात २०१८ मध्ये ४ हजार जणांचा मृत्यु झाला होता.  २०१९ मधील ३ हजार ९४९ पैकी ३ हजार ११० पुरुष असून ८३९ स्त्रीया आहेत. 

पुण्यात २०१८ मध्ये ४१२ रोड अपघात झाले होते. त्यात ६५ ने कमी होऊन गेल्या वर्षी ३३७ रोड अपघातात मृत्यु झाले होते. पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यु झाला होता. तर, ३ हजार ९३२ जणांचा मृत्यु इतर कारणांमुळे झाला आहे.

या मृत्युपैकी सर्वाधिक मृत्यु हे ३० ते ४५ आणि ४५ ते ६० या वयोगटातील अनुक्रमे ११५२ आणि ११५७ इतके झाले आहेत. 

वयोगटानुसार एकूण मृत्यु

वय       पुरुष                स्रिया      एकूण

१ ते १४       १४७               १४३         ३००

१४ ते १८        ५०               २३          ७३

१८ ते ३०      ४६५               १०१        ५६६

३० ते ४५      ९८५              १६७       ११५२

४५ ते ६०।      ९५७              २००     ११५७

६० वर्षाहून अधिक ५०६         १९५     ७०१

Web Title: Shocking! Pune ranks fourth in the country in accidental deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.