धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 4 हजार रुपये देऊन भारतात घुसले दहशतवादी; 'अशी' केली घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:55 PM2022-03-15T17:55:34+5:302022-03-15T18:02:47+5:30

Terrorists News : 2021 मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान दलालांच्या मदतीने घुसखोरी केली होती. सर्वात आधी जहूर नावाचा दहशतवादी भारतात दाखल झाला होता.

shocking revelations of jmb terrorists arrested in bhopal infiltration from indo bangladesh border | धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 4 हजार रुपये देऊन भारतात घुसले दहशतवादी; 'अशी' केली घुसखोरी

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 4 हजार रुपये देऊन भारतात घुसले दहशतवादी; 'अशी' केली घुसखोरी

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये जमात-ए-मुजाहिदीन बांग्लादेशच्या (JMB) 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 4 हजार रुपये देऊन हे दहशतवादी भारतात दाखल झाल्याची माहिती आता समोर आली आहे. स्वत: दहशतवाद्यांनी ATS च्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला. त्यांनी 2021 मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान दलालांच्या मदतीने घुसखोरी केली होती. सर्वात आधी जहूर नावाचा दहशतवादी भारतात दाखल झाला होता.

IG इंटेलिजेन्सी डॉक्टर आशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही दहशतवादी अलकायदा संघटनेची आयडीओलॉजी फॉलो करतात. इंटरनेट वॉइस कॉल्सच्या मदतीने संघटनेशी जोडलेल्या लोकांशी संवाद साधतात. भारत-बांग्लादेश बॉर्डरच्या दोन्ही बाजून दलालांचं नेटवर्क आहे. सुरुवातीच्या चौकशीत दहशतवाद्यांनी त्रिपुरातून भारतात दाखल होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र ATS कडून यांच्या जबाबाचाही तपास केला जात आहे. दहशतवादी अनेक महिन्यांपर्यंत भारत-बांग्लादेशच्या सीमेजवळी गावात राहिले. 

दहशतवाद्यांनी चौकशीत घुसखोरी केल्याचा मार्ग, सीमेत दलाल कशाप्रकारे घुसखोरांना भारतात आणतात याचीही माहिती दिली. दलालांचं नेटवर्क तोडण्यासाठी ATS ने स्पेशन टीम तयार केली आहे. DSP रँकचे अधिकारी या टीमचं नेतृत्व करतील. JMB च्या चारही दहशतवाद्यांना MPATS आणि केंद्रीय गुप्त एजन्सीच्या संयुक्त अभियानात रविवारी भोपाळमध्ये अटक करण्यात आली होती. सोमवारी ATS ने त्यांना कोर्टात हजर करत 28 मार्चपर्यंत रिमांडवर ठेवलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं की, आणखी दोन संशयास्पद व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दहशतवादी काही दिवस आसाममध्ये राहिले. यानंतर उत्तरप्रदेशात राहिले. ATS ते राहिलेल्या ठिकाणचा तपास करीत आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी संबंधित लोकल नेटवर्कचादेखील तपास केला जात आहे. याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपास एजन्सी त्यांना कुठून निधी पुरवला जातोय याचाही तपास करीत आहेत. चारही दहशतवादी पूर्णपणे ट्रेंड आहेत. त्यांचं हिंदीदेखील चांगलं आहे. त्यांच्या बोलण्यात बांग्लादेशी टोन ऐकू येत नाही. त्यामुळे भारतात येण्यापूर्वी त्यांनी हिंदी बोलण्याचं ट्रेनिंग घेतलं असू शकतं. ट्रेनिंगनंतर त्यांना भारतात पाठवण्यात आलं. भोपाळव्यतिरिक्त प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तपास एजन्सी याचीही माहिती जमा करीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: shocking revelations of jmb terrorists arrested in bhopal infiltration from indo bangladesh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.