धक्कादायक! जवानांच्या कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी मिळतेय अवघ्या 'सव्वा रुपयाची मदत'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 06:55 AM2019-02-17T06:55:14+5:302019-02-17T11:26:43+5:30
एनडीएफच्या आकडेवारीतून माहिती उघड
- मनिषा म्हात्रे
मुंबई : पुलवामामधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर विविध पोस्टद्वारे निषेधाचा सूर उमटत असतानाच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय संरक्षण निधीच्या (नॅशनल डिफेन्स फंड, एनडीएफ) आकडेवारीने लक्ष वेधले. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीनुसार, नागरिकांकडून वर्षाला सरासरी अवघ्या १ रुपये ३३ पैसे जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, एनडीएफमध्ये वर्षाला सरासरी ८० कोटी रुपये जमा होतात. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अबालवृद्ध, बेरोजगार, दारिद्र्यरेषेखालील ६५ कोटी नागरिक सोडले तरी उरलेल्या सरासरी ६० कोटी नागरिकांनी जवानांच्या थेट मदतीसाठी फंडातर्फे वर्षाला फक्त एक रुपया तेहतीस पैसे दिल्याचे समोर आले आहे. या फंडातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.
पुलगामामधल्या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ जवानांवर मृत्यू ओढावला. सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून श्रद्धांजली अर्पण होत असतानाच, फेसबुकवरून पुण्याचे श्रीरंग चितळे यांनी मदतनिधीवर प्रकाश टाकला. दिवसाला आपले दीडशे ते पाचशे रुपये विनाकारण खर्च होतात. त्यामुळे सव्वाशेपैकी शंभर कोटी जनतेने महिन्याला एक रुपया जरी जमा केला तरी, महिन्याकाठी शंभर कोटी रुपये जमा होतील. वर्षाला हाच आकडा बाराशे कोटींवर जाऊ शकतो. नुकत्याच चर्चेत आलेल्या ‘उरी’ सिनेमाने काही आठवड्यांत २०० हून अधिक कोटींचा गल्ला जमवला. मात्र हीच रक्कम गोळा होण्यासाठी सद्य:स्थितीत एनडीएफला ३ वर्षे लागतात. त्यामुळे यावर विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
संकेतस्थळाची अधिकृतता पडताळून पुढाकार घ्या
एनडीएफ फंडातील रक्कम फक्त शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दिली जाते. अनेकदा अपुरी माहिती तसेच अधिकृतेबाबतच्या भीतीमुळे नागरिक पुढाकार घेत नाहीत. त्यात सध्या पुलवामाच्या हल्ल्यानंतर याबाबत मदतीसाठी विविध संकेतस्थळांची माहिती समोर आली. मात्र, मदत करण्यापूर्वी योग्य संकेतस्थळाचीच निवड करणे गरजेचे आहे. शासनाच्या अधिकृत फंडच्या संकेतस्थळावर आयकराचीही सवलत मिळते.
- मेहुल कर्निक, डिफेन्स प्रवक्ता, मुंबई
गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी (रुपये कोटींमध्ये)
मिळालेला मदतनिधी
८0.९३
६५.८८
खर्च
२०१४
------------------
८४.७२
३३.९८
खर्च
२0१५
------------------
८३.५३
३३.९८
खर्च
२0१६
-----------------------
८२.0२
३0.२0
खर्च
२०१७
-----------------
८३.८५
६४.७४
खर्च
२०१८