धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:20 PM2024-10-01T16:20:52+5:302024-10-01T17:15:37+5:30

Saibaba's Idol Removed From 10 Temples In Varanasi: वाराणसीमधील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. आता येणाऱ्या दिवसांमध्ये वाराणसीमधील आणखी काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतील.

Shocking! Saibaba's idol removed from 10 temples in Varanasi, the reason that came to light  | धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

वाराणसीमधील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. आता येणाऱ्या दिवसांमध्ये वाराणसीमधील आणखी काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतील. सनातन रक्षक दलाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. सनातन रक्षक दलाने याबाबत सांगितले की, आतापर्यंत आम्ही अज्ञानामधून साईबाबांची पूजा करत होतो. आता आम्ही मूर्ती हटवत आहोत. पूर्ण सन्मानासह मंदिर व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत.

वाराणसीमध्ये मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची सुरुवात  बडा गणेश मंदिर येथून करण्यात आली. सनातन रक्षक दलाच्या सदस्यांनी या मंदिरातील साईबाबांची मूर्ती कापडामध्ये गुंडाळून तिथून बाजूला केली. त्यानंतर इतर मंदिरातील मूर्ती हटवण्याची तयारी सुरू झाली आहे.

साईबाबांच्या मूर्ती हटवण्यामागचं कारण सांगताना सनातन रक्षक दलाने सांगितले की, आम्ही साई बाबांचे विरोधक नाही आहोत. मात्र शास्त्रानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करणं वर्ज्य आहे. हिंदू धर्मानुसार मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती  आणि गणपती यांच्या स्वरूपात मूर्ती स्थापन केल्या जाऊ शकतात

.साईबाबांच्या पूजेवरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई पूजेला विरोध केला होता. तर बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनीही साई बाबांच्या पूजेला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, मी साईबाबांचा विरोधक नाही. साईबाबांची महात्मा म्हणून पूजा होऊ शकते. मात्र परमात्मा म्हणून त्यांची पूजा होऊ शकत नाही.  

Web Title: Shocking! Saibaba's idol removed from 10 temples in Varanasi, the reason that came to light 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.