धक्कादायक - शाळेचा गणवेश घातला नाही म्हणून पाचवीतल्या मुलीला मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 03:44 PM2017-09-11T15:44:28+5:302017-09-11T15:46:26+5:30

योग्य गणवेश घातला नाही म्हणून एका 11 वर्षांच्या मुलीला शिक्षा म्हणून मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा करण्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे

Shocking - the school girl is not wearing uniform because of her schooling | धक्कादायक - शाळेचा गणवेश घातला नाही म्हणून पाचवीतल्या मुलीला मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा

धक्कादायक - शाळेचा गणवेश घातला नाही म्हणून पाचवीतल्या मुलीला मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा

Next
ठळक मुद्देशाळेचा गणवेश का घालून आली नाहीस असं त्यांनी या मुलीला विचारलंओले कपडे घालून कसं येणार म्हणून घरातल्या कपड्यांमध्ये शाळेत आल्याचं ती म्हणालीसमाधान न झालेले पीटी शिक्षक तिच्यावर भडकले आणि तिला त्यांनी अमानवी शिक्षा केली

हैदराबाद, दि. 11 - योग्य गणवेश घातला नाही म्हणून एका 11 वर्षांच्या मुलीला शिक्षा म्हणून मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा करण्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. हैदराबादमधल्या रामचंद्रपूरम इथल्या राव महाविद्यालयात ही मुलगी पाचवीत शिकत आहे. ही मुलगी शाळेमध्ये घरातले कपडे घालून गेली होती. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी या मुलीला हटकले. शाळेचा गणवेश का घालून आली नाहीस असं त्यांनी विचारलं. आईनं गणवेश धुतला असून तो अद्याप सुखलेला नाही असं उत्तर त्या मुलीनं दिलं. तसंच ओले कपडे घालून कसं येणार म्हणून घरातल्या कपड्यांमध्ये शाळेत आल्याचं ती म्हणाली.

परंतु या तिच्या उत्तरानं समाधान न झालेले पीटी शिक्षक तिच्यावर भडकले आणि तिला त्यांनी मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा केली. तसंच आता पुन्हा असं होता कामा नये आणि शाळेच्या गणवेशातच यायला हवं असंही या शिक्षकानं तिला बजावलं. त्या मुलीनं या संदर्भात आपल्या पालकांनी चिठ्ठी दिल्याचं सांगितलं. ही चिठ्ठी डायरीत असून ती बघा असंही ती मुलगी म्हणाली. परंतु, त्या पीटी शिक्षकानं तिचं काही ऐकलं नाही व तिला अशी अमानवी शिक्षा दिली. या शिक्षकांनी ती चिठ्ठी पाहण्याची तसदीही घेतली नाही.

विशेष म्हणजे अन्य शिक्षकांनीही या मुलीला मदत केली नाही अथवा पालकांनी पाठवलेल्या चिठ्ठीला बघण्याचे कष्ट घेतले नाहीत. या मुलीच्या पालकांनी मुलीनं हा सगळा प्रकार कथन केल्याचा व्हिडीयो बनवला आहे. मुलांच्या टॉयलेटमध्ये आपण उभं असताना बाकीची मुलं कशी आपल्याकडे बघत होती आणि हसत होती हे ही या मुलीनं सांगितलं आहे. काही वेळांनं पीटी शिक्षकांनी तिला टॉयलेटमधून बाहेर काढून वर्गात जाण्यास परवानगी दिली.

या सगळ्या घटनेचा या मुलीनं इतकं धसका घेतला आहे की ती आता शाळेत जाण्यासच तयार नाहीये. मुलीच्या पालकांनी मुलीचा हे सगळं सांगतानाचा व्हिडीयो बनवला आणि या प्रकाराला वाचा फोडली असून काही बालक हक्क संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. बाल कायद्याअंतर्गत या पीटी शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. अद्याप पोलीसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही तसेच शाळेच्या व्यवस्थापनानेही काही खुलासा केलेला नाही.

Web Title: Shocking - the school girl is not wearing uniform because of her schooling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.