धक्कादायक - शॉक लागून बसमधले 6 ठार, 25 जखमी
By admin | Published: September 20, 2016 06:49 PM2016-09-20T18:49:25+5:302016-09-20T18:49:25+5:30
एक खासगी बस वाटेमध्ये 11 केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेच्या संपर्कात आली आणि बसलेल्या जोरदार धक्क्यामध्ये 6 प्रवासी ठार झाल्याची तर 25 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
धेनकनाल (ओदिशा) दि. 20 - एक खासगी बस वाटेमध्ये 11 केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेच्या संपर्कात आली आणि बसलेल्या जोरदार धक्क्यामध्ये 6 प्रवासी ठार झाल्याची तर 25 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ओदिशामधल्या धेनकनाल येथे शिशूमंदीर चौकानजीक ही दुर्घटना घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. जखमी झालेल्या 25 पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
संन्यासी ही खासगी बस कटकहून बिरासलला जात होती. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने बस चालकाने नेहमीचा रस्ता बदलला होता. या रस्त्यावर 11 केव्ही ची तार लोंबकळत होती, जी बसच्या टपावरील कॅरीअरच्या संपर्कात आली आणि त्याचा जोरदार झटका बसमधल्या प्रवाशांना बसला. यामध्ये सहा जण जागीच ठार झाले, तर 25 जण जखमी झाले. हा अपघात होताक्षणीच बसच्या चालकाने पोबारा केला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ओदिशा सरकारने प्रत्येकी दोन लाख तर ओदिशा वीज वितरण मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.