धक्कादायक! लग्नात गोळीबार, वधूच्या डोक्याला लागली गोळी, गंभीर अवस्थेत दाखल केलं रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:53 IST2024-11-11T14:53:36+5:302024-11-11T14:53:59+5:30
Punjab Crime News: पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नसमारंभ आटोपल्यानंतर वधूची सासरी पाठवणी होत असताना कुणीतरी गोळीबार केला. बंदुकीतून झाडण्यात आलेला गोळी नववधूच्या डोक्याला चाटून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

धक्कादायक! लग्नात गोळीबार, वधूच्या डोक्याला लागली गोळी, गंभीर अवस्थेत दाखल केलं रुग्णालयात
पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नसमारंभ आटोपल्यानंतर वधूची सासरी पाठवणी होत असताना कुणीतरी गोळीबार केला. बंदुकीतून झाडण्यात आलेला गोळी नववधूच्या डोक्याला चाटून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिरोझपूरमधील खाई खेमे गावामध्ये लग्न समारंभ आटोपल्यानंतर वधूला निरोप देण्याची लगबग सुरू झाली होती. त्याच वेळी कुणीतरी गोळीबार केला. ही गोळी वधूच्या डोक्याला लागून गेली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आता तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सांगितले की, पाठवणीच्या वेळी लागलेल्या गोळीमुळे ही नववधू गंभीर जखमी झाली आहे. आता ही गोळी कुणी चालवली याचा तपास आम्ही करत आहोत. तसेच नववधूची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे.