धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 05:54 IST2024-12-11T05:52:59+5:302024-12-11T05:54:08+5:30

निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

Shocking statistics! 55 thousand soldiers left out of the army; Information of the Central Government in the Rajya Sabha | धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह निमलष्करी दलातील ५५ हजार ५५५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफलचे ५५ हजार ५५५ जवान सेवेतून मुक्त झाले आहेत. यातील ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे, तर ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ७,६८४ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजीनामे दिले आहेत. २०२१ मध्ये १२,०१३ आणि २०२२ मध्ये १२,३७१ जवान सेवेतून मुक्त झालेत. मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक नोकरी सोडण्याच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. या वर्षी १२,३०२ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

किती जवानांनी केल्या आत्महत्या?
निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

Web Title: Shocking statistics! 55 thousand soldiers left out of the army; Information of the Central Government in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.