Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:53 AM2023-05-04T08:53:03+5:302023-05-04T08:54:02+5:30

ऑलिपिंक खेळाडूंचा प्रश्न आता कुठे तरी मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आंदोलककर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय

Shocking... The President of the Women's swati maaliwal Commission was picked up by the police by his arms and legs | Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं

Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. आंदोलनाचा आजचा बारावा दिवस असून विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन बाजू समजून घेतली. त्यानंतर, मध्यरात्री उशिरा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल याही आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 

ऑलिपिंक खेळाडूंचा प्रश्न आता कुठे तरी मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आंदोलककर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर बजरंग पुनियाने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

स्वाती मालिवाल या आंदोलकांची भेट घेण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवले, तसेच पोलिसांना त्यांना आंदोलकांकडून न जाण्याचे सांगत पोलीस कारमध्ये बसवून नेले. विशेष म्हणजे यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या हाता-पायाला धरुन पोलिसांनी त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घातले होते. या घटनेचा व्हिडिओ स्वत: मालिवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी स्वाती मालिवाल यांना अटक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

 

दरम्यान, बुधवारी मध्यरात्री दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यात महिला कुस्तीपटूंना शिविगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला आहे. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कुस्तीपटूंचे गंभीर आरोप

ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित कुस्तीपटूंनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केले आहेत.

Web Title: Shocking... The President of the Women's swati maaliwal Commission was picked up by the police by his arms and legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.