धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 09:59 AM2024-09-19T09:59:53+5:302024-09-19T10:00:41+5:30

Indian Railway News: कोलकात्याहून अमृतसरकडे जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही ट्रेन सुमारे ३० मिनिटांपर्यंत जालंधर स्टेशनपासून उलट दिशेने धावत राहिली.

  Shocking! The train from Kolkata to Amritsar ran in the opposite direction, when the driver realized...   | धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  

धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  

जगातील रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमधून दररोल कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. रेल्वे हे भारतामधील प्रवासाचं एक स्वस्त आणि सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र काही घटना अशाही घडत असतात. ज्यामुळे रेल्वे प्रशासनावर नामुष्की ओढवत असते. आता अशाच एका घटनेमुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोलकात्याहून अमृतसरकडे जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे.  

धक्कादायक बाब म्हणजे ही ट्रेन सुमारे ३० मिनिटांपर्यंत जालंधर स्टेशनपासून उलट दिशेने धावत राहिली. ३० मिनिटांनंतर नकोरडा जंक्शन येथे पोहोचल्यावर ट्रेन चुकीच्या दिशेला जात असल्याचे ड्रायव्हरला कळले. त्यानंतर इंजिन बदलून ट्रेन परत मार्गावर आणण्यात आली. या दरम्यान, ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवाशी घाबरून गेले. तसेच अनेकांनी सोशल मीडियावरून या घटनेबाबत सावालही उपस्थित केले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. तसेच वृंदावन रेल्वे स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर पुढे एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर बिहारमधील मुझफ्फरपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे मालगाडीचे काही डबे रुळांवरून उतरले होते. या अपघातात कुठललीही हानी झाल्याचं वृत्त नाही.  

Web Title:   Shocking! The train from Kolkata to Amritsar ran in the opposite direction, when the driver realized...  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.