मुस्कानला जमलं नाही म्हणून साहिलने हात धरुन केले खोल वार; सौरभच्या हत्येचा अहवाल समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:34 IST2025-03-22T15:26:36+5:302025-03-22T15:34:13+5:30
सौरभ राजपूतचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

मुस्कानला जमलं नाही म्हणून साहिलने हात धरुन केले खोल वार; सौरभच्या हत्येचा अहवाल समोर
Meerut Murder Case: मेरठच्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहे. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने त्याच्या विरोधात भयंकर कट रचत त्याला संपवलं. जवळपास महिनाभर कट रचून दोघांनी मिळून सौरभ राजपूतची निर्घृणपणे हत्या केली. मुस्कान आणि साहिलने सौरभची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरले होते. सौरभच्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र आता सौरभच्या शवविच्छेदन अहवालातून मुस्कानच्या निरागस चेहऱ्यामागचा क्रूरपणा समोर आला आहे.
लंडनहून परतलेल्या सौरभची मुस्कान आणि साहिलने मिळून हत्या केली होती. त्याच्या मृतदेह सिमेंटच्या ड्रममध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावण्याचा दोघांचा प्रयत्न होता. मात्र त्यांचे बिंग फुटले आणि हा सगळा प्रकार समोर आलाा. शवविच्छेदन अहवालात सौरभ राजपूतच्या वेदनादायक मृत्यूचे सत्य समोर आलं आहे. अहवालानुसार सौरभला आधी बेशुद्ध करण्यात आले होते. यानंतर मुस्कान त्याच्या छातीवर बसली. साहिलने मुस्कानला त्याच्या छातीत चाकूने कसे भोसकायचे हे सांगितलं. पण मुस्कानला चाकू मारता आला नाही तेव्हा साहिलने तिचा हात धरून तिला पुन्हा समजावले. मग मुस्कानने त्याच्या छातीवर तीन वार केले.
सौरभच्या छातीवर चाकूने तीन वार केल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झालं आहे. सौरभचा गळा चिरून त्याचे शीर कापण्यात आले. त्यानंतर पाय कापून धड वेगळे करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, सिमेंटमुळे मृतदेहही खराब झाला होता. आरोपींनी चाकूने जोरदार वार केले होते. सौरभच्या छातीत खोल खड्डा पडला होता. पाय मागे वळवले होते. नंतर मृतदेहावर अत्तरही ओतण्यात आले. डोके धडापासून वेगळे केले होते. हात मनगटापासून कापले होते आणि पायही धडापासून कापले होते.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला याला अटक केली आहे. मुस्कानने सौरभच्या हत्येसाठी चाकू, वस्तरा, ड्रग्ज, पॉलिथिन, ड्रम या वस्तू आधीच खरेदी केल्या होत्या. दोघांनी ३ मार्चच्या रात्री सौरभचा खून केला. ४ मार्च रोजी आरोपींनी मृतदेहाचे १५ तुकडे ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट ओतलं. एका रात्रीत ते सिमेंट मृतदेहासह दगडाप्रमाणे झालं.