धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे

By admin | Published: May 15, 2017 06:30 PM2017-05-15T18:30:36+5:302017-05-15T18:30:36+5:30

नव-या मुलानं स्वतःच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि वधूला कपडे उतरवण्यास सांगितले.

Shocking Wedding dresses | धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे

धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - ब-याचदा हुंड्यावरून पती-पत्नीचं नातं संपुष्टात आलेलं ऐकिवात असेलच. अनेकदा नव-या-बायकोचं पटत नसल्यानंही विभक्त झालेली जोडपी तुम्ही पाहिलीच असतील. मात्र भर लग्न मंडपातच नव-यानं होणा-या पत्नीला कपडे उतरवण्यास सांगितल्याचं कधी ऐकलं नसेल, मात्र उत्तर प्रदेशमधल्या महोबा जिल्ह्यात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीला होणा-या पत्नीवर संशय आल्यानं त्यानं तिला कुटुंबीयांसमोरच कपडे उतरवण्यास सांगितल्याची धक्कादायक बाब घडली आहे.

महोबा जिल्ह्यात राहणा-या जयहिंदचं लग्न तिजा नामक मुलीशी होत होतं. लग्नाची वरात लग्न मंडपात आल्यावर दोन्ही पक्षांकडील मंडळी एकमेकांचे आदरातिथ्य करण्यात दंग होती. पाहुणे मंडळीही लग्नातील जेवणाचा आस्वाद घेत होती. त्याच वेळी नव-याच्या एका नातेवाईकानं त्यांच्या कानात येऊन काही तरी सांगितलं. त्यानंतर नव-या मुलानं स्वतःच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि वधूला कपडे उतरवण्यास सांगितले. या प्रकारानंतर लग्नाच्या आनंदाची जागा गोंधळानं घेतली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी दोन्हीकडच्या वडिलधा-या मंडळींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. पंचायत बोलावण्यात आली आणि पंचायतीत ठरलं की, लग्न तोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तिजा हिला त्वचेचा विकार होणार नाही. त्यानंतर वधूला पोलीस ठाण्याच्याच एका वेगळ्या खोलीत घेऊन जाण्यात आलं आणि तिथे वराची काकी आणि चुलत बहिणींच्या समोर वधूचे कपडे उतरवण्यात आले.

कपडे उतरवल्यानंतर वधूला त्वचेचा विकार नसल्याचं वराची काकी आणि चुलत बहिणींच्या लक्षात आलं. त्यानंतर वर पक्षाकडची मंडळी पोलिसांसह लग्नमंडपात दाखल झाली आणि लग्नाच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. वरानंही हात जोडून वधूच्या कुटुंबीयांची माफी मागितली. ठाणेदार रिता सिंह म्हणाल्या, वधूच्या वडिलांनी स्वतःची तक्रार मागे घेतली आहे. वराच्या कुटुंबीयांकडून पोलिसांनी माफीनामाही लिहून घेतला आहे.

Web Title: Shocking Wedding dresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.