धक्कादायक! ६ महिन्यांच्या मुलीला कवेत घेतलं अन् महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:54 AM2024-01-11T11:54:15+5:302024-01-11T11:57:57+5:30

मंगळवारी रात्री एका महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या प्रकाराने परिसरात मोठा गोंधळ उडाला.

Shocking woman jumped from the 16th floor with A 6 month old girl | धक्कादायक! ६ महिन्यांच्या मुलीला कवेत घेतलं अन् महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून घेतली उडी

धक्कादायक! ६ महिन्यांच्या मुलीला कवेत घेतलं अन् महिलेने थेट १६ व्या मजल्यावरून घेतली उडी

ग्रेटर नोएडा इथं राहणाऱ्या एका महिलेनं सहा महिन्यांच्या मुलीसह १६ व्या मजल्यावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेसह तिच्या लहानग्या मुलीचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मायलेकीचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सारिका असं मुलीसह आत्महत्या केलेल्या ३३ वर्षीय महिलेचे नाव असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील बिसरखा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या 'लॉ रेसेडेन्सिया' या इमारतीत एक विवाहित महिला पती विदेशात असल्याने आपल्या माहेरच्या लोकांसोबत वास्तव्यास होती. मात्र मंगळवारी रात्री तिने थेट १६ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या प्रकाराने परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र या घटनेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाला होता.

तणावातून उचललं टोकाचं पाऊल?

चिमुकल्या मुलीसोबत महिलेने जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तर्क-वितर्क लावले जात असताना सदर महिलेच्या भावाने पोलिसांना सांगितलं की, मागील काही दिवसांपासून सारिका तणावात होती. एका डॉक्टरकडे ती याबाबत उपचारही घेत होती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंद करत कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली असून महिलेने हे पाऊल मानसिक तणावातूनच उचलले की यामागे अन्य काही कारण होते, याबाबतचा अधिक तपास केला जात आहे.
 

Web Title: Shocking woman jumped from the 16th floor with A 6 month old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.