#SHOCKING : पुरुष असल्याचा बनाव करत तीन अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्या तरुणीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 12:08 PM2018-01-29T12:08:01+5:302018-01-29T12:15:27+5:30
ही स्त्री गेले इतकी वर्ष पुरुष असल्याचा बनाव रचत होती. मात्र तिच्या पत्नींसहीत इतर कोणालाही याविषयी काहीच कल्पना आली नाही.
अनंतपूर : अनंतपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणीनं चक्क पुरुष असल्याचं नाटक करत तीन मुलींशी लग्न केलं. या तरुणीनं याधीच दोन मुलींशी लग्न केल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा तिसऱ्या पत्नीला आपण पुरुषाशी नाही तर स्त्रीशी लग्न केल्याचं समजलं तेव्हा या फसव्या तरुणीचं बिंग फुटलं.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, बी. रामदेवी असं या तरुणीचं नाव आहे. तामिळनाडूतील एका गिरणीत ही तरुणी काम करते. या गिरणीत काम करणाऱ्या एका १७ वर्षाच्या युवतीशी तिची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रामदेवीचे पोषाख पुरुषांसारखे असायचे. एवढंच नव्हे तर तिचं वागणं-बोलणंही तसंच होतं. त्यामुळे तिच्यावर कोणीच संशय घेतला नाही. दरम्यान, त्या १७ वर्षीय युवतीचं रामदेवीशी लग्न झालं. लग्नानंतर दोन महिन्यांनतर त्या अल्पवयीन युवतीला समजलं की आपण तिचा नवरा पुरुष नसून स्त्री आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं हा सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी त्वरीत रामदेवीविरोधात कडपा जिल्ह्यातील पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या रामदेवीची सखोल चौकशी केली असता तिची याआधी दोन अल्पवयीन मुलींशी लग्न झाल्याचं उघड झालं. या दोन मुली कडपा आणि अनंतपुरा या जिल्ह्यातील राहणाऱ्या होत्या. त्या मुलींचीही चौकशी केली तेव्हा असं समजलं की या दोघींचीही मानसिक अवस्था बिघडलेली आहे. लग्नानंतरच या दोघींना मानसिक आजार जडल्याचंही सांगण्यात आलंय. पुरुष असल्याची बतावणी करणाऱ्या या रमादेवीवर काय कारवाई होतेय हे पाहणंच उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान आपल्याकडे अद्यापही समलैंगिक लग्नांना मान्यता नसल्यानं तिनं फसवून लग्न केलं असण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे.
आणखी वाचा - घृणास्पद ! 81 महिलांवर बलात्कार करुन सीरिअल किलरनं केली हत्या