काशी विश्वनाथ मंदिरातील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी तागापासून बनविलेले पाठविले बूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:37 AM2022-01-11T08:37:52+5:302022-01-11T08:37:58+5:30
काशी विश्वनाथ धाम मंदिर परिसरात चामडी किंवा रबरापासून बनविलेले बूट घालण्यास मनाई आहे.
नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम आणि वाराणसी शहरासाेबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे एक वेगळेच नाते आहे. काशी विश्वनाथ धाममध्ये काम करणाऱ्यांबद्दल माेदींच्या मनात खूप आत्मीयता आहे. नुकतीच त्याची प्रचीती आली आहे. या ठिकाणी बहुतांश लाेक कडाक्याच्या थंडीतही अनवाणी काम करतात. त्यांची परिस्थिती जाणून पंतप्रधान माेदींनी त्यांच्यासाठी तागापासून बनविलेले १०० जाेडी बूट पाठविले आहेत.
काशी विश्वनाथ धाम मंदिर परिसरात चामडी किंवा रबरापासून बनविलेले बूट घालण्यास मनाई आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी असाे किंवा अंग भाजून काढणारे ऊन, या ठिकाणी काम करणाऱ्यांना अनवाणी राहावे लागते. मंदिराच्या परिसरात संगमवरच्या दगडापासून अनेक बांधकाम करण्यात आले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्यावर अनवाणी वावरणे अतिशय कठीण हाेते.
पंतप्रधान माेदींनी १३ डिसेंबर २०२१ राेजी काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले हाेते. त्यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाेबत भाेजन केले हाेते. तसेच सर्व स्वच्छता कामगारांवर फुलांचा वर्षावही केला हाेता. हे सर्व कर्मचारी, सेवादार, पुजारी, सुरक्षा रक्षक इत्यादींसाठी ताग, लाेकर तसेच रंगिबेरंगी धाग्यांपासून बनविलेले १०० जाेडी बूट तत्काळ पाठविले. हे बूट मंदिर परिसरातही त्यांना घालता येणार आहेत.