"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:17 PM2024-10-21T15:17:52+5:302024-10-21T15:23:06+5:30
पोलिसांच्या चौकशीत बिश्नोई गँगच्या शूटरने मोठा खुलासा केला आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी हरयाणामधून सुख्खू या शुटरला ताब्यात घेतले. या शूटरची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. या शुटरने २०२२ मध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार याच्या सांगण्यावरून सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्म हाऊसची रेकी केली होती. तो सलमान खानवर हल्ला करणार होता, पण त्याचा प्लॅन फसला.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुख्खाने रेकी करण्यासाठी सलमान खानच्या गार्डशी मैत्री केली होती. जून २०२४ मध्ये नवी मुंबईतील त्याच्या फार्महाऊसवर जाताना सलमान खानला टार्गेट केल्याचा दावाही मुंबई पोलिसांनी केला आहे. मात्र, त्याचा हा प्लॅन फसला. हा कट रचण्यापूर्वी एप्रिलमध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता.
या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय व्यक्त केला होता. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, हा हल्ला त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
सुख्खाला चार दिवसापूर्वी हरयाणातील पानिपत येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांना आधीच त्याची माहिती मिळाली होती. अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस पानिपतला पोहोचले. यादरम्यान सुख्खा ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्याच हॉटेलमध्ये पोलिसही थांबले. मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुख्खाला अटक केली.
पोलिसांनी सुख्खा याला ताब्यात घेतले तेल्हा तो मद्याच्या नशेत होता, त्याला त्याचे नावही सांगता येत नव्हते. याशिवाय ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही वाढवली होती. मात्र पोलिस रेकॉर्डमध्ये असलेल्या फोटोच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.