Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:15 AM2018-11-20T09:15:09+5:302018-11-20T09:58:06+5:30
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मात्र यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. शोपियानच्या नदिगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. नदिगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
#UPDATE One Army jawan has lost his life in the encounter. https://t.co/2ch1VAqg1q
— ANI (@ANI) November 20, 2018
#UPDATE Shopian encounter: Four terrorists have been gunned down by security forces. Operation continues #JammuAndKashmirpic.twitter.com/e0OASB8eaZ
— ANI (@ANI) November 20, 2018
#JammuAndKashmir: An encounter has started between security forces and terrorists at Nadigam village in Shopian district. 2 to 3 terrorists are believed to be trapped. More details awaited.
— ANI (@ANI) November 20, 2018