ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:54 PM2018-08-01T12:54:33+5:302018-08-01T15:17:46+5:30

10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे.

Shopkeeper rejects acceptance of 10 rupees from customer | ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

Next

भोपाळ - 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याला एका स्थानिक न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात घडला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक लोकअभियोजक अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, आकाश नावाच्या ग्राहकाने  अरुण जैन या दुकानदाराकडून  17 ऑक्टोबर 2017 रोजी दोन रुमाल खरेदी केले होते. त्याबदल्यात त्याने दुकानदाराला दहा रुपयांची दोन नाणी दिली होती. मात्र ही नाणी आता चलनात नाहीत, असे सांगून दुकानदाराने ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. 

वाद वाढल्यावर आकाश याने ही नाणी अजूनही चलनात आहेत आणि दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असा मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे असे वारंवार सांगितले. मात्र एवढे सांगितल्यावरही दुकानदाराने त्याच्याकडून नाणी स्वीकारली नाहीत. तसेच त्याच्याकडून रुमाल परत घेऊन त्याला माघारी धाडले.
त्यानंतर या ग्राहकाने संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना देऊन दुकानदाराविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी अरुण जैन या दुकानदाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेला दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यासंबंधीचा आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. 

 त्यानंतर जौरा येथील न्यायदंडाधिकारी जे.पी. चिडार यांच्या न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीनंतर न्यायालयाने दुकानदार अरुण जैन याला दोषी ठरवले. तसेच त्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला.  

Web Title: Shopkeeper rejects acceptance of 10 rupees from customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.