मोठा दिलासा! आजपासून इतर दुकानेही उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 07:56 AM2020-04-25T07:56:13+5:302020-04-25T12:58:39+5:30

CoronaVirus Lockdown केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत.

shops can open from today; Shopping malls, complexes will remain closed hrb | मोठा दिलासा! आजपासून इतर दुकानेही उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार

मोठा दिलासा! आजपासून इतर दुकानेही उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार

googlenewsNext

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून सर्वच दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. 


केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. देशात उद्यापासून काही व्यापारी व्यवहार होण्यास सुरुवात होऊ शकते. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ही दुकाने नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये असली पाहिजेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. याशिवाय गृह मंत्रालयलाने काही अटीही लागू केल्या आहेत. 

हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन वगळले
कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन मधील दुकाने बंदच राहणार आहेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. तसेच बाजार, कपड्यांची दालने जिथे ग्राहक स्वत: फिरतात ती किंवा तशा प्रकारची इतर दुकाने बंद राहणार आहेत.


या अटींनुसार सर्व दुकाने संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशांना प्रदेशांच्या स्थापना कायद्यानुसार नोंदणीकृत असायला हवीत. तसेच या दुकानांमध्ये निम्मे कामगार काम करू शकणार आहेत. त्यांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आदेशात म्हटले आहे. 

 

आणखी वाचा...

CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"

किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज

आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2020

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन

अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली

सावधान! आता पीएफ अ‍ॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल

 

 

Web Title: shops can open from today; Shopping malls, complexes will remain closed hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.