सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:10 AM2019-09-19T06:10:16+5:302019-09-19T06:10:30+5:30

सशस्त्र दहशतवादी काश्मीर खोऱ्यात रहिवाशांत दहशत निर्माण करून प्रशासनाच्या आदेशांना धुडकावून जबरदस्तीने दुकाने बंद करीत आहेत

 Shops close, shops forced by armed terrorists | सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या

सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या

Next

श्रीनगर : सशस्त्र दहशतवादी काश्मीर खोऱ्यात रहिवाशांत दहशत निर्माण करून प्रशासनाच्या आदेशांना धुडकावून जबरदस्तीने दुकाने बंद करीत आहेत तर कधी घरे, दुकानांत शिरून मालकांना धमकावत आहेत. रात्रीतून भिंतींवर धमक्यांची भित्तीपत्रके चिकटवली जात आहेत किंवा दुकानांना सील केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.
जम्मू आणि काश्मीर पोलीस अधिकृतपणे यावर काहीही बोलत नाहीत. कारण त्यांना स्वत:चे नाव समोर येऊ द्यायचे नाही. परंतु नाव न सांगण्याच्या अटींवर त्यांनी परिस्थिती आमच्या हाताबाहेर जाऊ शकेल, असे म्हटले. दहशतवाद्यांनी दुकानांना सील करण्याच्या आणि बाजारात, मशिदीत व इतर ठिकाणी हस्तलिखित तसेच टाईप केलेले पोस्टर्स चिकटविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वेगवेगळे दहशतवादी गट ‘हे करा, ते करू नका’ असे आदेश देत असून, काश्मीर खोºयात हा प्रकार नवा नाही, असे ते म्हणाले. सशस्त्र अतिरेक्यांनी दुकानांत शिरून मालकांना दुकान बंद ठेवण्याच्या धमक्या दिल्याच्या व दक्षिण काश्मीरमधील जम्मू आणि काश्मीर बँकेच्या शाखांमध्ये बळजबरीने शिरून कर्मचाºयांना कामे करू नका, असे सांगितल्याच्याही घटना घडल्या असल्याचे ते म्हणाले.
>पाक रेंजर्सकडून पोस्टस्वर गोळीबार
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सांबा-कठुआ सेक्टरमध्ये बॉर्डर आऊट पोस्टस्वर पाकिस्तानच्या रेंजर्सनी बुधवारी गोळीबार केला, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाºयाने सांगितले.
रेंजर्सनी सकाळी नऊ ते अकरा यावेळेत हिरानगर आणि सांबा सेक्टर्समधील बॉर्डर आऊट पोस्टस्वर छोट्या शस्त्रांतून गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ना कोणी जखमी झाले, ना मालमत्तेची हानी झाली.
हिरानगर-सांबा सेक्टर्समधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बॉर्डर आऊट पोस्टस्वर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार करण्याचा हा सलग दुसरा दिवस होता, असे हा अधिकारी म्हणाला.

Web Title:  Shops close, shops forced by armed terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.