थोडक्यात नागपूर
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:38+5:302014-12-20T22:27:38+5:30
दलित साहित्य समाज विकासाचे साधन
Next
द ित साहित्य समाज विकासाचे साधन नागपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह आयोजित करण्यात आला. यानिमित्त दलित साहित्याचे योगदान या विषयावर बाबुराव धनवटेे सभागृह, शंकरनगर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदेव गायकवाड तर प्रमुख वक्ते म्हणून शैलेंद्र लेंडे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. संध्या अमृते उपस्थित होते. अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी लेंडे म्हणाले, दलित साहित्याची चर्चा या देशातील विषमतेविरु द्ध आहे. या साहित्याने समता, बंधुता आणि स्वातंत्र्य रुजविले. दलित साहित्यानेच भारतीय समाजाला मुख्य विचार दिला. संध्या अमृते म्हणाल्या, महिलांचे स्थान दलितांपेक्षाही कमी होते. दलित कवींनी प्रथम हे दु:ख मांडले. नितनवरे म्हणाले, दलितांना हीन समजण्याची वृत्ती सनातनी आहे. जयदेव गायकवाड यांनीही यावेळी भाष्य केले. संचालन प्रमोद मुनघाटे यांनी तर आभार राजेश कुंभलकर यांनी मानले. ----------काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिंदे यांची भेट नागपूर : सोलापूरच्या आ. युवानेता परिणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांच्या परीक्षेचाच हा काळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. गांधीबाग, इतवारी येथील अतुल कोटेचा यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्या बोलत होत्या. शिंदे म्हणाल्या, अनेक आघाड्यांवर आपल्याला समोर जायचे आहे. कोरड्या दुष्क ाळामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे. काळा पैसा भारतात परत आणायचा आहे. अनेक मुद्यांवर भाजप सरकार असंतोषाचा सामना करीत आहे. सामान्य जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांना तत्पर राहावे लागेल, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी अतुल कोटेचा यांनी आ. परिणिती शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मनीष छल्लाणी, रितेश सोनी, रिंकू जैन, श्रीकांत ढोलके व लोकेश बरडिया, अमित भय्या, आकाश गुजर, आकाश चौरिया, गोपाल पट्टम, अश्वीन झवेरी, प्रवीण गुप्ता, राजु वाजुरकर, संकेत मिश्रा, बिट्टू गंगवानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.