व्हॉट्स अॅपवरून लवकरच करता येणार फोन कॉल्स

By admin | Published: April 29, 2016 12:30 PM2016-04-29T12:30:40+5:302016-04-29T13:16:32+5:30

तुम्ही लवकरच व्हॉट्स अॅप, स्काइप किंवा व्हायबर या मोबाइल अॅप्सवरून लँडलाइन किंवा मोबाइलवर फोन करू शकणार आहात

Short-term phone calls from the What's App | व्हॉट्स अॅपवरून लवकरच करता येणार फोन कॉल्स

व्हॉट्स अॅपवरून लवकरच करता येणार फोन कॉल्स

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - तुम्ही लवकरच व्हॉट्स अॅप, स्काइप किंवा व्हायबर या मोबाइल अॅप्सवरून लँडलाइन किंवा मोबाइलवर फोन करू शकणार आहात. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि दूरसंचार कंपन्यांमध्ये करार करण्याचा मार्ग केंद्र सरकारने खुला केल्यामुळे ही सुविधा आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे आहेत. यामुळे फोन करणं आताच्या तुलनेत एकदम स्वस्त होणार आहे, कारण इंटरनेटच्या डेटा पॅकच्या माध्यमातूनच हे कॉल करण्यात येणार आहेत. अर्थात, देशातल्या अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवेचा दर्जाच अत्यंत सुमार असल्याने या सुविधेचा लाभ लाखो युजर्सना घेता येणार नाही तो भाग वेगळा.
रिलायन्स जिओ लवकरच देशभरात 4जी सेवा सुरू करणार असून व्हॉइस कॉलची सुविधा देण्याचा त्यांचा विचार असून त्यांच्यासाठी असे करार ही पर्वणी ठरणार आहे.
अशा करारांना यापूर्वीच दूरसंचार नियामक मंडळाने अनुकूलता दर्शवली असून दूरसंचार कंपन्यांच्या परवान्यांच्या अटींमध्ये त्यानुसार बदल करण्यात येतील.

Web Title: Short-term phone calls from the What's App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.