“आम्ही हतबलपणे कोरोना रुग्णांना मरताना पाहतोय”; एका दिवसात १०७ मृत्यू झालेल्या छत्तीसगडमधील भीषण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:23 PM2021-04-13T19:23:14+5:302021-04-13T19:25:11+5:30

CoronaVirus: छत्तीसगड राज्यांत आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

shortage of oxygen and beds junior doctor told critical situation of biggest hospital in chhattisgarh | “आम्ही हतबलपणे कोरोना रुग्णांना मरताना पाहतोय”; एका दिवसात १०७ मृत्यू झालेल्या छत्तीसगडमधील भीषण वास्तव

“आम्ही हतबलपणे कोरोना रुग्णांना मरताना पाहतोय”; एका दिवसात १०७ मृत्यू झालेल्या छत्तीसगडमधील भीषण वास्तव

Next
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये आरोग्य सुविधांचे तीनतेराआरोग्यमंत्र्यांनी दिली कबुलीनाइलाजास्तव संपावर गेल्याची डॉक्टरांची प्रतिक्रिया

रायपूर: देशभरात कोरोनाचा (CoronaVirus) उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने दीड लाखांवर जात आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगड राज्यांत आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत असून, डॉक्टरांना पुरेसे पीपीई कीटही मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. (shortage of oxygen and beds junior doctor told critical situation of biggest hospital in chhattisgarh)

डॉ. भीमराव आंबेडकर हे छत्तीसगडमधील मोठे रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयातील एका ज्युनियर डॉक्टरने येथील भयावह परिस्थिती कथन केली असून, या ठिकाणी डॉक्टरांना मास्क आणि पीपीई कीटही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा दावा केला आहे. सोमवारी देशभरात कोरोनामुळे ८७९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, यापैकी १०७ जण छत्तीसगडमधील होते. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स यांनी कमतरता असून, आमच्या डोळ्यांनी त्यांना मरताना पाहतोय, अशी उद्विघ्न प्रतिक्रिया येथील डॉक्टरांनी दिली आहे.  छत्तीसगडमधील या परिस्थितीमुळे डॉक्टर संपावर गेल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा नाराजीचा सूर

आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंह देव यांनी राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता असल्याची कबुली दिली असून, कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. केंद्राकडून मुद्दामहून खराब व्हेंटिलेटर पाठवण्यात आल्याचा दावाही देव यांनी यावेळी बोलताना केला. आरोग्य विभागाची जबाबदारी असली, तरी आम्ही व्यवस्था करू शकत नाही. जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. तसेच मृतदेह ठेवण्यासाठी अधिकची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

नाइलाजास्तव संप

कोरोना संकट आल्यापासून डॉक्टर्स, नर्सेस अवितरपणे सेवा देत आहेत. दिवसातील आठ तास पीपीई कीट घालून डॉक्टर्स काम करत असतात. मात्र, रुग्णालयाकडून योग्य पद्धतीने व्यवस्था केली जात नाही. आम्हाला ना पीपीई कीट मिळतेय, ना मास्क मिळतोय आणि ना ग्लोव्ह्ज. कोरोना रुग्णांसाठी बेड्स नाही. रुग्णांना सरळ परत पाठवण्यात येते. नाइलाजास्तव आम्हांला संपावर जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. 
 

Web Title: shortage of oxygen and beds junior doctor told critical situation of biggest hospital in chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.