शेपूट वाकडंच ! पाकिस्तानच्या गोळीबारात जवान जखमी

By admin | Published: May 12, 2017 09:59 AM2017-05-12T09:59:35+5:302017-05-12T10:55:45+5:30

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारत बीएसएफचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Shot a leg! The soldiers were injured in Pakistan firing | शेपूट वाकडंच ! पाकिस्तानच्या गोळीबारात जवान जखमी

शेपूट वाकडंच ! पाकिस्तानच्या गोळीबारात जवान जखमी

Next

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 12 - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. शुक्रवारी (12 मे) देखील पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला आहे. जम्मूमधील अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या गोळीबारत बीएसएफचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.  
 
बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. 
 
यापूर्वी बुधवारी रात्री जवळपास 10.45 वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा पती जखमी झाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगित दिल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येत आहे.
(फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे)
 
या शिवाय,  1 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. तसेच लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
 
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला गेला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला होता. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या 200 व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले होते. पाकच्या जवानांनी नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते.  
 
जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे ही अमानुषता असून, भारतीय सशस्त्र दल या अमानुष कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.  तर योग्यवेळी योग्य ठिकाणी या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे नॉदर्न कमांडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 

Web Title: Shot a leg! The soldiers were injured in Pakistan firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.