कायदेशीर मार्गाने पैसा कमावलेल्यांनी घाबरू नये- जेटली
By admin | Published: November 9, 2016 06:26 PM2016-11-09T18:26:24+5:302016-11-09T18:26:24+5:30
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्यांनी प्रमाणिकपणे आणि कायदेशीररित्या पैसा कमावला आहे त्यांनी चिंता करायची गरज नाही
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्यांनी प्रमाणिकपणे आणि कायदेशीररित्या पैसा कमावला आहे त्यांनी चिंता करायची गरज नाही, असं केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.
तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या तुम्ही ते बँकेत जमा करु शकता, पण यात तुम्हाला करमुक्ती मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तुम्हाला 10 लाख रूपये बॅंकेत डिपॉझीट करायचे असतील तरी तुम्ही ते करू शकता. तुम्ही कायदेशीरपणे कमावलेल्या पैशांवर आमचा आक्षेप नाही. पण बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या लोकांवर आयकर विभागाकडून कारवाई होईल असा इशाराच त्यांनी दिला आहे.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच येणा-या नव्या 2000 रूपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप असल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असून अशा निरर्थक बातम्या कशा येतात हे माहित नाही अशा स्पष्ट शब्दात केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आज दुपारी पत्रकार परिषदेत सांगितलं.