विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये...
By Admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:07+5:302016-03-15T00:34:07+5:30
लोकमत मुलाखत
ल कमत मुलाखतजळगाव- अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. असे व्हायला नको... हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाचे प्रकरण घडले. त्यानंतरचे जेएनयुमधील कन्हैया कुमारचे प्रकरण समोर आले. सर्वत्र विद्रोह, देशद्रोह..., अशी चर्चा सुरू झाली... पण विद्रोह, देेशद्रोह आणि आक्रोश असे वेगवेगळे मुद्दे आहेत. जातीपाती, सामाजिक नाकेबंदीमुळे आक्रोश होत आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहीजे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत कवी, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. मंजुळे हे सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासंबंधी आले असता त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्न- रोहित वेमुला, कन्हैया कुमारच्या प्रकरणाकडे आपण कसे पाहता?मंजुळेे- रोहित वेमुला व कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले ते चुकीचे आहे. असा अन्याय इतरत्र कुणावर व्हायला नको. विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा घटक असतो. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे योग्य वाटत नाही. प्रश्न- आपल्या फॅण्ड्री सिनेमामागील स्फूर्ती कुणाची आहे?मंजुळे- मी जातीने वडार आहे. पण आपल्याकडे जातीपातीच्या भिंती आहेत. अशी नाकेबंदी आहे की त्यात अडकवून ठेवले जाते. तुच्छ वागणूक व इतर असे वाईट प्रकार होतात. शाळेत बास्केटबॉल खेळताना माझा एका मुलीस हात लागला. तिने मला फॅण्ड्री म्हटले... तिच्यातला तो मनुवाद बोलत होता. मला महिनाभर तिच्या बोलण्याचा मानसिक त्रास झाला. नंतर मी स्वत: ला सावरले. श्रमप्रतिष्ठेला आपल्याकडे महत्त्व नाही. जे स्वच्छता व इतर श्रमाची कामे करतात, त्यांना महत्त्व दिले जात नाही... हा असला अनुभव मी फॅण्ड्री साकारण्यामागे कारणीभूत ठरला आहे. प्रश्न- आगामी प्रकल्पांबाबत काय?मंजुळे- एप्रिल महिन्यात आमचा सैराट चित्रपट येत आहे. त्यात चार गाणी आहेत. मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. फॅण्ड्री युवकांना फारसा आवडला नव्हता. कारण त्यात गाणी नव्हती. आणखी चित्रपट क्षेत्रात नवीन नवीन विषय पुढे येत आहेत. त्यात व्यस्त आहे. प्रश्न- खान्देशात चित्रपट साकारण्याचा मनोदय आहे काय?मंजुळे- खान्देश हा बहिणाबाई व इतर थोर व्यक्तींचा भाग आहे. संधी मिळाली तर निश्चितच प्रकल्ह हाती घेईल, पण सध्या तरी फारसा वेळ नाही. मी ग्रामीण भागातला असलो तरी शहरात आल्यानंतर मंुबई, पुण्याबाहेर जाणे होत नाही.