बिहारच्या पूरस्थितीसाठी पुन्हा फराक्का बॅरेजच्या नावाने ओरड; जलसंपदा मंत्री म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:17 AM2021-03-14T06:17:04+5:302021-03-14T06:18:40+5:30
एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे.
पाटणा :बिहारमध्ये दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसाठी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी बांगलादेशसाेबत गंगा नदीच्या पाणीवाटपाचा करार आणि फराक्का बॅरेजच्या चुकीच्या रचनेला दाेषी ठरविले आहे. बिहारला पावसाळ्यात दरवर्षी भीषण पुराचा तडाखा बसताे. त्यानंतर वर्षभर दुष्काळी स्थिती निर्माण हाेते. याचे खापर जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी फराक्का बॅरेजवर फाेडले आहे. (Shout again in the name of Farakka Barrage for Bihar flood situation water resources minister commented on it)
एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे. पावसाळ्यानंतर नदीपात्रात १४०० क्युसेक एवढा विसर्ग हाेणे आवश्यक आहे. मात्र, ताे केवळ ४०० क्युसेक एवढाच राहताे. त्यामुळे राज्याला पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नाही, असे झा म्हणाले.
प्रत्येक शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये पंजाब आणि हरयाणाप्रमाणे हरितक्रांती झालेली दिसून येईल, असे झा म्हणाले.
सातत्याने ओरड
पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर फराक्का बॅरेज उभारण्यात आले आहे. त्याचे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले. बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवून माेठ्या परिसराला पाणीपुरवठा करण्याचा हेतू हाेता. मात्र, त्यावर बांगलादेशने आक्षेप घेतला हाेता. प्रत्यक्षात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीचा गाळ वाहून नेण्यासाठी पुरेसा प्रवाह नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे बिहारमध्ये सातत्याने पूरस्थिती निर्माण हाेते, अशी ओरड नेहमी हाेते.