उत्तर प्रदेशपाठोपाठ आता 5 नोव्हेंबरला दिल्लीत होणार 'ढिशक्याव ढिशक्याव'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:46 AM2018-10-30T08:46:34+5:302018-10-30T08:56:54+5:30

दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये 5 नोव्हेंबर रोजी फेसबुकच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

shout thain thain in cp to celebrate eco friendly diwali | उत्तर प्रदेशपाठोपाठ आता 5 नोव्हेंबरला दिल्लीत होणार 'ढिशक्याव ढिशक्याव'

उत्तर प्रदेशपाठोपाठ आता 5 नोव्हेंबरला दिल्लीत होणार 'ढिशक्याव ढिशक्याव'

Next

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील संभल येथे पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदुक बिघडली. ही बंदूक जाम झाल्याने त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ढिशक्याव ढिशक्याव आवाज काढून गुंडांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या एन्काऊंटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वा-यासारखा पसरला होता.

त्याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये 5 नोव्हेंबर रोजी फेसबुकच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. Shout 'Thain Thain' in CP to celebrate eco-friendly diwali या नावानं फेसबुक इव्हेंज पेज बनवण्यात आलं असून, याच्या माध्यमातून कनॉट प्लेसमधल्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांना या कार्यक्रमांतर्गत एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर तिथे इको- फ्रेंडली दिवाळीही साजरी केली जाणार आहे. जेणेकरून जनतेनं फटाक्यांच्या बंदुकीनं नव्हे, तर तोंडानेच ढिशक्याव ढिशक्यावचा आवाज काढून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.

याचं आयोजन 5 नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत करण्यात आलं आहे. या इव्हेंटला द वंडर बॉटल नावाचं फेसबुक पेट ऑर्गनाइज करतंय. ज्याला नवा देण्यात आलं आहे की, ही दिवाळी ढिशक्याव ढिशक्याववाली आहे. जवळपास 3 हजार जणांना या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तर 16 हजार लोक या इव्हेंटमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. 

Web Title: shout thain thain in cp to celebrate eco friendly diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.