पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे, मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 01:11 AM2020-09-29T01:11:55+5:302020-09-29T01:12:45+5:30
वाहनचालकांना दिलासा : मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती
नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार वाहनासंदर्भातील डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी, मोबाईलचा उपयोग करण्यास वाहनचालकांना परवानगी देण्यात आली आहे.
दुरुस्तीनुसार वाहनाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखविण्यासाठी वाहनचालक वा वाहनात बसलेली माणसे मोबाईलचा वापर करू शकतात. डिजिलॉकरसारख्या ठिकाणी सेव्ह केलेली वाहनविषयक कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी वाहतूक पोलीस अजिबात नकार देत नाहीत. कागदपत्र तपासणीतला बदल आता सर्वांच्याच अंगवळणी पडत आहे. मात्र, ही कागदपत्रे डिजिलॉकर, एम-परिवर्तन अशा सरकारी पोर्टलवरच अपलोड केलेली असावीत.
नेव्हिगेशनसाठीही परवानगी
च्वाहन चालविताना आपल्याला जिथे जायचे आहे त्या ठिकाणचे नेव्हिगेशन करण्यासाठी वाहनचालक मोबाईलचा वापर करू शकतो. मात्र, त्याच्या मोबाईल वापरामुळे दस्तुरखुद्द वाहनचालक, त्या वाहनात बसलेले लोक किंवा अन्य वाहनांचे चालक यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी असेही केंद्रीय मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्तीत म्हटले आहे.
च्या कायद्यातील दुरुस्त्यांमुळे चालकांसमोरच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहेत.