‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 02:14 PM2024-01-09T14:14:48+5:302024-01-09T14:15:18+5:30

Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीची जय्यत तयारीही सुरू आहे. दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सक्त ताकिद दिली आहे.

'Show interest, don't be aggressive...', Modi urges ministers on Ayodhya's Pranpratisthapana ceremony | ‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत भाजपा आणि केंद्र सरकारमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तसेच या सोहळ्यासाठीची जय्यत तयारीही सुरू आहे. दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सक्त ताकिद दिली आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान आस्था प्रदर्शित करा, मात्र आक्रमकता दिसता कामा नये, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील मंत्र्यांना कुठल्याही प्रकारची विधानं करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मंत्र्यांनी सरकारच्या मर्यादांचीही काळजी घ्यावी, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मंत्र्यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान, आपापल्या क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी, असाही सल्ला दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, आपापल्या क्षेत्रातील लोकांना २२ जानेवारीनंतरच रामलल्लांच्या दर्शनाला घेऊन जा. दरम्यान, २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामध्ये देशातील निवडक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी सूचना दिलेली आहे.  

Web Title: 'Show interest, don't be aggressive...', Modi urges ministers on Ayodhya's Pranpratisthapana ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.