मी मोदींना मदत केल्याचा पुरावा दाखवा - स्वराज यांचे विरोधकांना आव्हान

By admin | Published: August 6, 2015 12:49 PM2015-08-06T12:49:25+5:302015-08-06T13:16:30+5:30

ललित मोदीप्रकरणी आपल्यावर होणारे आरोप खोटे व निराधार असून मी मोदींना मदत केल्याचा पुरावा दाखवा, असे आव्हान सुषमा स्वराज यांनी विरोधकांना केले.

Show proof that I helped Modi - challenge opponents of Swaraj | मी मोदींना मदत केल्याचा पुरावा दाखवा - स्वराज यांचे विरोधकांना आव्हान

मी मोदींना मदत केल्याचा पुरावा दाखवा - स्वराज यांचे विरोधकांना आव्हान

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - एखाद्या मरणासन्न अवस्थेतील स्त्रीला मानवतेच्या दृष्टीने मदत करणे हा जर गुन्हा ठरत असेल तर हो मी तो गुन्हा केला आहे. माझ्या जागी लोकसभा अध्यक्ष ( सुमित्रा महाजन)  किंवा सोनिया गांधी असत्या तर त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली नसती का? असा भावनिक सवाल करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी लोकसभेत आपली बाजू मांडली. तसेच ललित मोदींप्रकरणी आपल्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, चुकीचे व निराधार आहेत असे सांगत मी मोदींना मदत केल्याचा एखादा तरी पुरावा दाखवा, असे आव्हान स्वराज यांनी विरोधकांना केले.
आयपीएल बेटिंग, पैशाची अफरातफर आदी प्रकरणी शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ( सक्तवसुला संचलनालय) ललित मोदींना नोटीस बजावलेली असताना ते इंग्लंडमध्ये लपून बसले आहेत व त्यांना मदत केल्याचा आरोप सुषमा स्वराज यांच्यावर आहे. या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ माजवत स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या तीन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज ठप्प पाडले आहे. अखेर याप्रकरणी स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू स्पष्ट केली.
 'मी ललित मोदींना कोणतीही मदत केलेली नाही अथवा त्यांच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंट्ससाठी मी ब्रिटन सरकारकडे कधीही शिफारस अथवा विनंती केलेली नाही ' असा दावा करत स्वराज यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. ' मोदी यांची पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत असून त्यांच्यावर पोर्तुगालमध्ये उपचार सुरू होते. यावेळी त्यांचा आजार दहाव्यांदा उफाळून आला आणि तो जीवेघेणा ठरत असल्याचे सांगत अशावेळी त्यांच्या पतीने त्यांच्यासोबत असणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे मी मोदींची नव्हे तर त्यांच्या मरणासन्न अवस्थेतील पत्नीची जी या ( भारत) या देशाची नागरिक आहे आणि जिने कोणताही गुन्हा केलेला नाही, अशा स्त्रीची मदत केली, असे स्वराज म्हणाल्या.

 

Web Title: Show proof that I helped Modi - challenge opponents of Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.