Shraddha Murder Case : श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:25 PM2022-11-20T14:25:29+5:302022-11-20T14:36:47+5:30

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांनी आफताबला थेट दिल्लीत पोलीस कोठडीत पाहिले. पोलिसांनी आफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करावी, असे ते म्हणाले

shraddha mother wanted to see the marriage function of her daughter before death | Shraddha Murder Case : श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...

googlenewsNext

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाला आहे. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील विकास यांची इच्छा नसतानाही ते श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या लग्नासाठी तयार झाले होते. खरंतर श्रद्धाच्या आईची तब्येत खूप खराब होती आणि त्या जिवंत असताना आपल्या लेकीचं लग्न पाहावं ही तिची शेवटची इच्छा होती. पत्नीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विकास डिसेंबर 2019 मध्ये आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, आफताबचा लहान भाऊ असद याने त्यांना घरात येऊ दिलं नाही. याच दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये श्रद्धाच्या आईचे निधन झाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विकास वालकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांनी आफताबला थेट दिल्लीत पोलीस कोठडीत पाहिले. पोलिसांनी आफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करावी, असे ते म्हणाले. विकास वालकर आपल्या मुलीच्या लग्नासाठी वसईत आफताबच्या घरी गेले होते तेव्हाची घटना आठवून भावूक झाले. तेव्हा त्यांची पत्नी आणि मेव्हणी त्यांच्यासोबत होत्या. त्यावेळी श्रद्धा घर सोडून आफताबसोबत राहू लागली होती आणि दुसरीकडे विकास यांच्या पत्नीची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. आईची तब्येत बिघडत असल्याने त्यांनी श्रद्धाला लवकरात लवकर लग्न करण्यास सांगितले होते, मात्र त्यावेळी श्रद्धाने लग्नास नकार दिला होता. हे सर्व माहीत असूनही आफताबच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले, मात्र त्यांना भेटू दिले नाही.

आईच्या मृत्यूनंतर श्रद्धाने लग्नाला दिला होकार 

विकास यांनी त्यानंतर श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने आफताबशी लग्न करण्याची चर्चा केली होती पण त्याचवेळी श्रद्धाच्या आईचे निधन झाल्याने विकास यांनी तिला काही काळ थांबण्यास सांगितले होते. कदाचित याचाही राग श्रद्धाला असावा, म्हणूनच तिने घरचा पत्ताही कुटुंबीयांना सांगितला नाही. आफताब तिला मारहाण करत असे, असे श्रद्धाने कधीच सांगितलं नसल्याचं विकास यांनी म्हटलं आहे. मात्र, ती आफताबच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि आफताब तिला मारहाण करायचा हे त्यांना श्रद्धाच्या मित्रांनी सांगितलं होतं. 

मुलाच्या नोकरीच्या बहाण्याने सोडले घर 

वसईतील घरातून बाहेर पडताना आफताबच्या कुटुंबीयांनी इमारतीतील रहिवाशांना सांगितले की, त्यांचा लहान मुलगा असद याला मुंबईत नोकरी लागल्याने ते मुंबईला शिफ्ट होत आहेत. ट्रेनने ये-जा करताना त्रास होत असल्याने तो मुंबईला शिफ्ट होत असल्याचेही त्याने सांगितले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आफताबला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. 

आफताबच्या संपर्कात आलेल्या 'त्या' मुलींचं काय झालं?; श्रद्धा हत्याकांडात 'नवा ट्विस्ट'

श्रद्धा हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना नवनवीन माहिती मिळत आहे. पोलिसांना आता श्रद्धाचे जुने फोटो आणि Whatsapp चॅट सापडले आहे. ज्यामध्ये श्रद्धाने आफताब मारत असल्याचे सांगितले. तपासादरम्यान आफताबची चौकशी केल्यानंतर आता आफताब हा सीरियल किलर असण्याची शक्यताही पोलिसांना आहे. आफताबच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. आफताब डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्यामुळे पोलीस त्याची हिस्ट्री चेक करण्यात व्यस्त आहेत. आफताब हा सिरीयल किलर असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून असे दिसते की, त्याने श्रद्धासोबत जे केले, ते त्याने आधीही केले असावे. पोलिसांनी त्याचा डिजिटल फूटप्रिंट आणि तो ज्या मुलींच्या संपर्कात आला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shraddha mother wanted to see the marriage function of her daughter before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.