करवत वापरून आफताबने केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 06:31 AM2023-01-15T06:31:06+5:302023-01-15T06:32:44+5:30
मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आरोपी आफताब पुनावाला याने करवतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते, अशी माहिती ‘शवविच्छेदन विश्लेषणा’तून (पोस्टमॉर्टम अनालिसिस) समोर आली आहे.
आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. दिल्ली पोलिसांनी एम्स रुग्णालयात मंगळवारी २३ तुकड्यांचे ‘शवविच्छेदन विश्लेषण’ केले होते. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
१० जानेवारी रोजी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. श्रद्धा आणि आफताब हे ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.