Shraddha Murder Case: क्रूरकर्मा आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:02 AM2022-11-18T07:02:39+5:302022-11-18T07:02:47+5:30
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे.
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने शीर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर बाहेरून खाद्यपदार्थ मागवून त्याने मृतदेहाशेजारीच ते खाल्ले; शिवाय तो अधूनमधून श्रद्धाच्या शिराला मेकअपही करायचा, असेही चौकशीत पुढे आले आहे.
पोलिसांकडील पुरावे...
nआफताबची कबुली.
nआफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल.
nजंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त.
nआफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.
मृतदेहाची खांडोळी अन् वेब सीरिज पाहिली
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.
मैत्रीण फ्लॅटवर
श्रद्धाची हत्या केल्यानंतरही आफताबने एका मैत्रिणीला फ्लॅटवर आणले होते. श्रद्धा फ्लॅटवर नसतानाही तो पूर्वी असे करीत असे. यावरून दोघांत भांडणे होत होती. पोलीस या मुलीचाही शोध घेत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा जुना फोन ओएलएक्सवर विकल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस हा फोन परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.