Shraddha Murder Case: '...तोपर्यंत तरुणी मरत राहतील', स्वाती मालीवाल यांनी श्रद्धा हत्याकांडावर उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:45 PM2022-11-24T14:45:18+5:302022-11-24T14:46:06+5:30
2020 मध्ये आफताबने श्रद्धाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Shraddha Murder Case: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी श्रद्धा मर्डर प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 2020 मध्ये श्रद्धाने केलेल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही, ती केस बंद का केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत या देशातील व्यवस्था पोकळ राहतील, तोपर्यंत मुली अशाच मरत राहतील, असेही त्या म्हणाल्या.
23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीत तिने सांगितले होते की, आफताबने तिला गळा दाबून तिचे तुकडे करण्याची धमकी दिली होती. त्यादिवशी आफताबने तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. तिन लिहिले होते की, 'आफताब मला शिवीगाळ आणि मारहाण करतो. आज त्याने माझा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. तो मला नेहमी धमकावतो. गेल्या 6-7 महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे,' अशी माहिती तिने आपल्या तक्रारीत दिली होती.
श्रद्धा ने आफ़ताब के ख़िलाफ़ मुंबई पुलिस को 2020 में ही कम्प्लेंट कर दी थी कि वो उसको मार डालेगा और उसके टुकड़े करके फेंक देगा! आज तक पुलिस द्वारा कोई कार्यवाही क्यूँ नहीं की गई? जब तक इस देश के सिस्टम इतने खोखले रहेंगे, लड़कियाँ ऐसे ही मरती रहेंगी! pic.twitter.com/z3a7d3HFoA
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 23, 2022
तक्रारीवर कारवाई का झाली नाही?
या तक्रारीवर का करण्यात आली नाही, असा प्रश्न मालविय यांनी उपस्थित केला आहे. 2020 चे हे तक्रार पत्र समोर आल्यानंतर मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र पाहिले असून, त्यात श्रद्धाने अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा तपास केला जाईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे. श्रद्धाच्या सांगण्यावरूनच केस बंद करण्यात आली होती, अशी माहिती आहे. मीरा भाईंदर-वसई विरार (MBVV) आयुक्तालयाचे डीसीपी सुहास बावचे म्हणाले की, श्रद्धाने तिच्या लेखी निवेदनात म्हटले होते की, "तिचा आणि आफताब पूनावाला यांच्यातील वाद मिटला आहे". निवेदनानंतरच तक्रार मागे घेण्यात आली. त्यावेळी योग्य ती सर्व कारवाई पोलिसांनी केली.